डीबीजेमधील ऑरबिट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

डीबीजेमधील ऑरबिट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

Published on

Rat१p११.jpg-
26O14858
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयात केम-फेस्ट २०२५ ‘ऑरबिट’ स्पर्धेचे उद्‍घाटन करताना मंगेश तांबे.

डीबीजे महाविद्यालयात ‘केम-फेस्ट’ची रंगत
१४१ विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : डीबीजे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आणि आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केम-फेस्ट २०२५ ऑरबिट या महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील केम पोस्टर स्पर्धेत वैष्णवी माटे आणि सन्वी अदावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत व्हावे तसेच रसायनशास्त्र विषयांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी केम-पोस्टर, केम-रांगोळी, केम- प्रोजेक्ट, केम-शब्दकोडे ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्‍घाटन न. ए. सोसायटीचे अध्यक्ष मंगेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. डीबीजे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मोरे, डॉ. आठवले व स्नेहल कुलकर्णी हे उपस्थित होते. डॉ. खोत, डॉ. शिंदे, डॉ. माने, डॉ. बाबर, प्रा. माने, प्रा. अरुण जाधव, प्रा. सोनाली खर्चे आणि प्रा. जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केम पोस्टर स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील वैष्णवी माटे आणि सन्वी अदावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दीक्षा झोरे आणि श्रेयशा नरळे (द्वितीय), रिधिमा रामटेके आणि वैष्णवी तटकरे (तृतीय) यांनी यश मिळवले तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील संकेत राणे व यश सावर्डेकर, अश्विनी ठोंबरे, रुणाली कांबळी व कल्याणी आदावडे यांनी या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.
पुढील निकाल असे ः केम-रांगोळी स्पर्धा-कनिष्ठ महाविद्यालयीन गट ः इरा सावंत व सई शिंदे, वैभवी महाडिक व श्रावणी साळुंखे, तन्वी कदम व विधी मोहिते. वरिष्ठ महाविद्यालयीन गट ः सुदेश सुतार व यश सावर्डेकर, भूमी जुवळे व सानिका पवार, स्वरांगी म्हैसकर. केम प्रोजेक्ट स्पर्धा - कनिष्ठ महाविद्यालयीन गट ः जवाद अश्रफ चौगुले व अमन बिजले, रिदिमा रामटेके व वैष्णवी तटकरे, दिव्या राठोड व राणी शर्मा. वरिष्ठ महाविद्यालयीन गट ः साईराज धाडवे, ओमकार टकले, फरीहा तांबे व मिसबा भरवेलकर. केम क्रॉसवर्ड स्पर्धा- कनिष्ठ महाविद्यालयीन गट ः रिदिमा रामटेके, तनिषा भुरण, अनिल केंद्रे. वरिष्ठ महाविद्यालयीन गट ः कुणाल सोलकर, साहिल सुर्वे, मधुरा रेळेकर. दरम्यान, बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कामथे, तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी, सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिपळूण, माध्यमिक महिला विद्यालय पाग चिपळूण आणि इंग्लिश मीडियम स्कूल पाग, चिपळूण या शाळेतील एकूण २१७ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com