चौकुळ सड्यावर पुन्हा फुलली ''कोच''

चौकुळ सड्यावर पुन्हा फुलली ''कोच''

Published on

swt116.jpg ते swt118.jpg
14904
चौकुळः येथील सडा परिसरात फुललेली ‘कोच’ पर्यटकांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
swt119.jpg
14907
''कोच''चे मनमोहक फुल

चौकुळ सड्यावर पुन्हा फुलली ‘कोच’
१६६ वर्षे दुर्लक्षितः संशोधकांच्या अभ्यासामुळे प्रकाशझोतात
रुपेश हिरापः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः पश्चिम घाटातील सड्यांवर आढळणारी आणि अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी ‘लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा’ अर्थात स्थानिक भाषेत ‘कोच’ ही वनस्पती तब्बल सात वर्षांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या सड्यावर पुन्हा एकदा फुलली आहे. १८५१ मध्ये पहिल्यांदा शोध लागल्यानंतर ही वनस्पती तब्बल १६६ वर्षे दुर्लक्षित राहिली होती, जिचा पुनर्शोध आता संशोधकांच्या सखोल अभ्यासामुळे प्रकाशझोतात आला आहे. ​या वनस्पतीचा शोध सर्वप्रथम १८५१ मध्ये एन. ए. डॅल्झेल यांनी बेळगावजवळील चोर्ला घाटातून लावला होता. त्यानंतर जवळजवळ १६६ वर्षांनी डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकुळच्या सड्यावरून ही वनस्पती पुन्हा शोधून काढली. डॉ. ऋतुजा कोलते-प्रभूखानोलकर, राहुल प्रभूखानोलकर, प्रभा पिल्ले, डॉ. शरद कांबळे, डॉ. ज्ञानशेखर आणि डॉ. जनार्थनम या संशोधकांच्या गटाने गेल्या नऊ वर्षांपासून या प्रजातीचे सखोल निरीक्षण केले आहे. ​या संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारवी आणि बांबूच्या प्रजातींप्रमाणेच ‘कोच’ ही वनस्पती देखील ‘मोनोकार्पीक प्लेटेशियल’ प्रवृत्तीची आहे. म्हणजेच या प्रजातीची सर्व झाडे एकाच वेळी फुलतात आणि बिया परिपक्व झाल्या की मरून जातात.
संशोधकांच्या निरीक्षणानुसार, नोव्हेंबर २०१६ मध्ये ही झाडे फुलली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ती मरून नवीन रोपे तयार झाली आणि आता सात वर्षांनंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये ही झाडे पुन्हा बहरली आहेत. हे संशोधन ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
​कोकण आणि घाटमाथ्यावरील सड्यांची जमीन खडकाळ असते. तेथे मातीचे प्रमाण कमी असून उन्हाळ्यात कडक ऊन आणि पावसाळ्यात वेगवान वारे अशा प्रतिकूल परिस्थितीत या वनस्पती तग धरतात. ‘आययुसीएन’च्या जागतिक यादीनुसार ही वनस्पती अतिधोक्यात असलेल्या श्रेणीत मोडते. या नव्या संशोधनामुळे सड्यांचे पर्यावरणीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, या प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com