कोकण जलकुंड ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

कोकण जलकुंड ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

Published on

- Rat१p१९.jpg
P२६O१४८६७
दुधेरे ः शेतकरी सूर्यकांत खेराडे यांचे जलकुंड पाहणी करताना जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर व कृषी सहाय्यक.
----
‘कोकण जलकुंड’ शेतकऱ्यांसाठी वरदान
मंडणगडात ५० ठिकाणी जलसाठे; टंचाईकाळात शेतीला पाणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.१ ः कोकणात पावसाचे प्रमाण मुबलक असले तरीही ऑक्टोबरनंतर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाने राबवलेली कोकण जलकुंड योजना मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कातळ जमीन, लहान शेतजमिनी आणि पाणीसाठ्याच्या मर्यादा लक्षात घेऊन २०२४–२५ पासून सुरू केलेल्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळू लागला आहे.
मंडणगड तालुक्यातील दुधेरे गावातील सूर्यकांत खेराडे यांच्या शेतात कोकण जलकुंडाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पाऊस बंद झाल्यानंतरही या जलकुंडातील पाण्याचा वापर करून त्यांनी बागेतील फळझाडांची फवारणी तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केलेल्या ४५ नारळरोपांचे संगोपन यशस्वीपणे केले आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर म्हणाले, कोकणात पाऊस जास्त पडत असला तरीही जानेवारीनंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते; मात्र जलकुंडामुळे ५२ हजार लिटरपर्यंत संरक्षित पाणी उपलब्ध होत असून, सिंचन व फवारणीसाठी त्याचा मोठा उपयोग होत आहे. मंडणगड तालुक्यात आतापर्यंत ५० जलकुंड पूर्ण झाले असून, सुमारे साडेआठ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे.
-------
चौकट
पाण्याची शाश्वत हमी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या माध्यमातून मोठा फायदा होत आहे. प्रत्येकी ५ मीटर लांब, ५ मीटर रुंद व २ मीटर खोल अशा जलकुंडात सुमारे ५२ हजार लिटर पाणी साठवणूक होते. २५ गुंठ्याला एक जलकुंड व हेक्टरी चार जलकुंडांपर्यंत लाभ घेण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. कोकणातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कोकण जलकुंड योजना ही पाण्याची शाश्वत हमी देणारी ठरत असून, कृषी विकासाला नवी दिशा देत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com