सावंतवाडी येथे आजपासून 
पोलिस स्थापना दिन सप्ताह

सावंतवाडी येथे आजपासून पोलिस स्थापना दिन सप्ताह

Published on

सावंतवाडी येथे आजपासून
पोलिस स्थापना दिन सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील पोलिस ठाण्याच्या वतीने २ ते ८ जानेवारी या कालावधीत ''पोलिस स्थापना दिन सप्ताह'' साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यानिमित्त विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विविध प्रबोधनात्मक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. ​या सप्ताहाची सुरुवात उद्या (ता. २) सकाळी १० वाजता आरपीडी हायस्कूल येथे निबंध स्पर्धेने होईल. याच दिवशी मळगाव हायस्कूल येथे पोलिस कामकाज, सायबर क्राईम आणि शस्‍त्रास्‍त्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. तसेच ३ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायबर विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक, भरोसा सेल, वाहतूक शाखा आणि पोलिस वाद्यवृंद पथकाचे माहितीपर स्टॉल्स उभारले जातील. ​क्रीडा आणि आरोग्याच्या दृष्टीने ४ रोजी सायंकाळी ४ वाजता पोलिस ठाणे मैदानावर पोलिस, पत्रकार व शासकीय विभागांची व्हॉलीबॉल स्पर्धा, ५ ला सकाळी ६.३० वाजता मोती तलाव परिसरात ''मॉर्निंग वॉक'' कार्यक्रम, ६ ला सायंकाळी ५ वाजता पोलिस ठाणे आवारात ज्येष्ठ नागरिक मेळावा व महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, ​सप्ताहाच्या सांगता टप्प्यात ७ ला पोलिस ठाण्याच्या सभागृहात रोटरी क्लब व अन्य संस्थांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर होईल. या सप्ताहात तालुक्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com