रोटरी महोत्सवाला हजारोंची उपस्थिती
14931
कुडाळ ः येथील रोटरी क्लब महोत्सवात नववर्षाचे स्वागत करताना सिने नाट्य अभिनेता संतोष जुवेकरसह रोटरीचे पदाधिकारी. (छायाचित्रे ः अजय सावंत)
रोटरी महोत्सवाला हजारोंची उपस्थिती
नववर्षाचे स्वागतः कुडाळमध्ये रंगला शानदार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः नृत्य, गायन आणि हास्याच्या दुनियेत कुडाळ रोटरी क्लबचा नववर्ष स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप सोहळा हजारो रसिकांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीत शुभेच्छाच्या वर्षांवात दिमाखात पार पडला. सिने सृष्टी व स्थानिक कलाकारांनी बुधवारचा दिवस (ता. ३१) विविध कार्यक्रमांनी यादगार ठरवला.
कुडाळ रोटरी क्लबच्या वतीने नववर्ष स्वागत अनुषंगाने २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत भव्य रोटरी महोत्सवाचे आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. तिन्ही दिवस हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. हजारो रसिकांची उपस्थिती या महोत्सवाचे विशेष होते. बुधवारी (ता. ३१) सिने नाट्य अभिनेता संतोष जुवेकरसह गायक रवींद्र खोमणे, गायिका अमिता घुगरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेल गायनाने तसेच चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, परी ग्रुप यांनी केलेल्या विविधांगी नृत्याविष्काराने हा सोहळा अधिक बहरत गेला. मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करत रोटरी परिवाराने हजारो रसिकांच्या उपस्थितीत नववर्ष सोहळा साजरा केला.
या सोहळ्याच्या निमित्ताने कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी सायबर कॅफे अंतर्गत मोबाईलवरून होणारी फसवणूक याबाबत उद्बोधक मार्गदर्शन केले. ''धुमधडाका'' या कार्यक्रमाचे निवेदन किरण खोत यांनी केले. यावेळी डॉ. प्रशांत कोलते, राजीव पवार, मकरंद नाईक, अॅड. राजीव बिले, सचिन मदने, गजानन कांदळगावकर, डॉ. संजय केसरे, डॉ. संजय सावंत, शशिकांत चव्हाण, दिनेश आजगावकर, सायली प्रभू, मानसी जोशी, पद्मा वेंगुर्लेकर, नीता गोवेकर, राजन बोभाटे, अमित वळंजू, रुपेश तेली, प्रमोद भोगटे, गीतांजली कांदळगावकर, अभिषेक माने, आरोही माने, सौ. तेली, प्राची तेरसे, बाबा पोरे, डी. के. परब, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.
चौकट
‘छावा’ चा अनुभव
''छावा'' चित्रपटात रायाजीची भूमिका केलेले संतोष जुवेकर म्हणाले, "छावा चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी वेगळा आहे. सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आमचे श्रद्धास्थान आहेत. हा चित्रपट मला मिळाला हा देवाचा आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे. हा चित्रपट नाही तर आम्ही सर्वांनी मिळून बांधलेले महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराच्या उभारणीतील विटेचा भाग होण्याचे भाग्य मला मिळाले. मायबाप प्रेक्षकांमध्ये नववर्ष स्वागत साजरा करताना अत्यंत आनंद होत आहे."
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

