जीवनशैलीत बदल केल्यास कर्करोगावर मात शक्य

जीवनशैलीत बदल केल्यास कर्करोगावर मात शक्य

Published on

kan12.jpg
14944
हळवल : येथील चर्चासत्रात डॉ.विनयकुमार आवटे यांनी विषमुक्‍त सेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन केले.

जीवनशैलीत बदल केल्यास कर्करोगावर मात शक्य
डॉ. विनयकुमार आवटे : हळवल येथे विषमुक्त सेंद्रिय शेती या विषयावर चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ : कर्करोग होण्यामागे अन्नपद्धती आणि जीवनशैली ही प्रमुख कारणे आहेत. कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करायचे असल्यास अन्नपद्धतीत सुधारणा व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालय, भारत सरकारचे सल्लागार डॉ. विनयकुमार आवटे यांनी केले.
कणकवली कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि हळवल ग्रामपंचायत यांच्यावतीने ग्रामपंचायत हळवल येथे कर्करोगा जनजागृती विषयक चर्चासत्र झाले. यात डॉ. आवटे बोलत होते. यावेळी ‘आयुष मॅगझिन’च्या संपादक हेमा शर्मा, हळवल सरपंच वंदना चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, सदस्य रोहित राणे, ग्रामपंचायत अधिकारी वर्षा कदम, ग्राम महसूल अधिकारी राकेश इनकर, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. डॉ. किरण जगताप, प्रा. सागर गावडे, प्रा. विद्या मारकड, प्रा. पूजा मुंज आदी उपस्थित होते.
डॉ. आवटे यांनी कर्करोग होण्यास कारणीभूत घटक, कर्करोगाविषयी असलेले समज-गैरसमज, कर्करोग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच उपलब्ध उपचार पद्धती यांचे सविस्तर व सोप्या भाषेत विश्लेषण केले. तसेच, आरोग्यदायी अन्न पद्धती व नियमित व्यायामाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
हेमा शर्मा यांनी विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ग्रामस्थ व स्वयंसेवकांशी संवाद साधत कर्करोग प्रतिबंध आणि सेंद्रिय शेती याबाबत उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमात सरपंच वंदना चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे यांनी कणकवली कॉलेजमार्फत आयोजित या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी कॅन्सरचे प्रमाण वाढत असले तरी लोकांनी घाबरण्याऐवजी प्रतिबंधासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी केले. प्रेरणा जाधव आणि प्रणाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. किरण जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com