''फार्मसी'' अभ्यासक्रमाच्या हितासाठी प्रयत्न
swt126.jpg
14947
ओरोस ः पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘त्विशा २.०’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोकण चॅप्टरचे उद्घाटन करताना डॉ. राकेश सोमाणी, भूपतसेन सावंत व इतर मान्यवर.
‘फार्मसी’ अभ्यासक्रमाच्या हितासाठी प्रयत्न
डॉ. राकेश सोमाणीः ओरोसमध्ये ‘त्विशा २.०’ महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज आहे. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी व चैतन्य निर्माण होते. ‘आप्ती एमएस त्विशा’च्या माध्यमातून आम्ही सदैव विद्यार्थी व फार्मसी शिक्षकांच्या हिताचे उपक्रम राबवित राहु, असे प्रतिपादन राज्यअध्यक्ष डॉ. राकेश सोमाणी यांनी ओरोस येथे केले.
असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखा आणि श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, डिगस यांच्यावतीने आयोजित ‘त्विशा २.०’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोकण चॅप्टरचे उद्घाटन डॉ. सोमाणी यांच्या हस्ते ओरोस क्रीडा संकुलात उत्साहात पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर ''आप्ती''चे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. संदीप झिने, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब, एस.पी.एस. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, ज्ञानदीप कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे (कोकण समन्वयक), विजयराव नाईक कॉलेज प्राचार्य राजेश जगताप, विवेक कुलकर्णी (त्विशा कोकण निमंत्रक), यशवंतराव भोसले डिप्लोमा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सत्यजित साठे, तन्मय पटवर्धन, सरस्वती कॉलेज प्राचार्या डॉ. रोहिणी विचारे, एसपीएस कॉलेज विभाग प्रमुख संदेश सुळ, कार्यक्रम समन्वयक शंकर मुसळे, अमित शहापूरकर आदी उपस्थित होते.
यानिमित्त आयोजित धावणे व खो खो स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील एकूण ८ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे ः खो-खो (मुले व मुली)-पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी दोन्ही गटात प्रथम. द्वितीय इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (मुले व मुली) साडवली, देवरुख. ४०० मीटर धावणे (मुले)-सोहम घाग (सरस्वती कॉलेज तोंडवली) प्रथम, प्रतीक रेवाळे (इंदिरा इन्स्टिट्यूट साडवली, देवरुख). २०० मीटर धावणे (मुली)-प्रगती देसाई (पुष्पसेन सावंत कॉलेज) प्रथम, प्रांजली खाडे (गोविंदराव निकम कॉलेज सावर्डे) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. उर्वरीत स्पर्धा १८ जानेवारीपर्यंत पार पडणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक महादेव परब यांनी आभार मानले.

