मालवण येथे रविवारी लोकप्रतिनिधींचा सत्कार

मालवण येथे रविवारी लोकप्रतिनिधींचा सत्कार

Published on

मालवण येथे रविवारी
लोकप्रतिनिधींचा सत्कार
मालवण : सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा रविवारी (ता. ४ ) सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे होणार आहे. या सोहळ्यात मालवण शहराच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी सकल भंडारी हितवर्धक संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला संस्थाध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, प्रदीप वेंगुर्लेकर, सचिव पंकज पेडणेकर, सहसचिव सागर हडकर, राजेंद्र आंबेरकर, जयप्रकाश परुळेकर, मिलिंद झाड, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, भाऊ साळगावकर, राजीव आचरेकर, भाऊ हडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
..................
सिंधुदुर्गनगरीत सोमवारी
जिल्हास्तर लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरीः जिल्हास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जानेवारीतील लोकशाही दिन सोमवारी (ता. ५) मायनाक भंडारी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी १ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
....................
म्हापण येथे आज
पालखीचे आगमन
म्हापणः संत श्री गोपाळबोध स्वामींची श्री विठ्ठल रखुमाई पालखीचे उद्या (ता. २) सायंकाळी म्हापण खालचावाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आगमन होणार आहे. यानिमित्ताने रात्री नाना गोसावी बुवा (मळगाव) यांचे कीर्तन व आरती, शनिवारी (ता. ३) सायंकाळी ७.३० वाजता विवेक जोशी बुवा (वाळपई गोवा) यांची शिष्या योगेश आईर हिचे कीर्तन, रात्री ९.३० वारकरी भजन, रविवारी (ता. ४) सायंकाळी आरती होऊन श्री गोपाळबोध स्वामी पालखीचे आंबेव्हाळ येथे प्रस्थान होईल. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
........................

Marathi News Esakal
www.esakal.com