बोरघर येथे पथनाट्याद्वारे जनजागृती

बोरघर येथे पथनाट्याद्वारे जनजागृती

Published on

डॉक्टर्स गॅदरिंग २४ ला चिपळुणात
चिपळूण : चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात २०२६च्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच हॉटेल तेज ग्रँड येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी फिनिक्स ऑर्थोपेडिक्स अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली येथील डॉ. ओंकार कुलकर्णी आणि डॉ. संतोष माळी हे उपस्थित होते. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. यानंतर दोन्ही मान्यवर डॉक्टरांनी सांधेरोपणावरील आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती तसेच हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि त्यावरील नव्या उपचारपद्धतींबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित डॉक्टरांनी या व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या वेळी स्पोर्ट्स डे हा उपक्रम ११ व १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा डॉक्टर्स गॅदरिंग कार्यक्रम २४ जानेवारी रोजी डी स्टार रिसॉर्ट येथे होणार आहे, असे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी सांगितले.

14862
बोरघर येथे पथनाट्याद्वारे जनजागृती
मंडणगड ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत माहू बोरघर व आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपलं गाव आपली जबाबदारी’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग, जबाबदारीची जाणीव व ग्रामस्वच्छता, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरणसारख्या विषयांवर या पथनाट्यातून सशक्त संदेश देण्यात आला. पथनाट्याचे सादरीकरण ३१ डिसेंबर रोजी बोरघर येथे करण्यात आले. या पथनाट्यात शिक्षिका वनिता वाणी, कल्याणी गोविलकर, अंजली केंद्रे, नेत्रा जाधव आणि गणेश भावे यांनी गावातील विविध स्तरांवरील प्रमुख व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारल्या. आपल्या सजीव अभिनयातून व प्रभावी संवादांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण केली. गावविकास हा केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ व समृद्ध गाव घडवण्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, हा संदेश पथनाट्यातून ठळकपणे मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com