अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करा

अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करा

Published on

- rat१p१४.jpg ः
P२६O१४८६१
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग रस्ता सुरक्षितता अभियानाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने करताना प्रांताधिकारी जीवन देसाई. सोबत पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी.
----
अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करा
प्रांताधिकारी देसाई ः एसटीच्या सुरक्षितता अभियानाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : दुचाकी, चारचाकीचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत असतात; परंतु एसटीच्या अपघातांचे प्रमाण कमी आहे. अनेकदा वाहन नीट चालवले तर अपघात टाळणे शक्य होते. अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. वाहनाचा वेग, नियम न पाळणे व मोबाईलवर बोलण्यामुळे अपघात होत असतात. एखाद्या घरातील कर्ता पुरुष अपघातात गेला तर तो सामाजिक व आर्थिक चिंतेचा विषय होतो. त्यामुळे सर्वांनीच वाहन नियमात चालवा, असे आवाहन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्या रस्ता सुरक्षितता अभियानाचे उद्‍घाटन आज माळनाका येथील एसटीच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मंचावर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अवधूत कुंभार, मोहिते, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) बालाजी आडसुळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रज्ञेश बोरसे म्हणाले, एसटी चालकांनी बस चालवताना मोबाईल वाहकाकडे जमा करायचा आहे. हेडफोनवर बोलताना चालक आढळल्यास काही चालकांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली आहे. अपघात होऊ नये याकरिता खबरदारी, समुपदेशन करण्यात येते. जादा वेग असल्यासही आरटीओकडून चलनही येते. एसटी बसला स्पीड लॉक असल्याने वाहनाचा वेग मर्यादित असतो. कर्मचाऱ्यांच्या जीवावरच प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येत आहे.
पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर म्हणाले, सर्वात सुरक्षित वाहन म्हणजे लाल परी आहे. चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे एसटीची सुरक्षित वाहतूक होत आहे. आपल्यासोबत चाळीस-पन्नास कुटुंबातील व्यक्ती प्रवास करत असल्याने जबाबदारी ओळखून एसटी चालवा. लिपिक गुलाब उके यांनी सूत्रसंचालन केले. वाहतूक निरीक्षक महेश सावंत यांनी आभार मानले.
------
चौकट
या कर्मचाऱ्यांचा झाला सत्कार
या प्रसंगी विनाअपघात सेवा देणारे चालक विनायक आत्माराम पवार, विनायक दामोदर पवार व संजय आखाडे, (प्रत्येकी २५ वर्षे), अमित लांजेकर, गुरुप्रसाद रणसे (प्रत्येकी १५ वर्षे), जास्त उत्पन्न आणल्याबद्दल वाहक आण्णासो सादळे, दादासाहेब शिंदे, आगारात उत्कृष्ट काम करणारे यांत्रिक कर्मचारी के. एस. पाध्ये, एस. एम. खरात, महेश सुवारे, सुयोग भुवड यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com