घारपीत विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
swt131.jpg
14988
घारपी उडेली ः येथे वनराई बंधारा उभारताना विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ.
घारपीत विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
बांदाः घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्काऊट-गाईड तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने घारपी उडेली येथे नववर्षाच्या प्रारंभी वनराई बंधारा उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मोलाचा संदेश दिला. यामुळे भूजल पातळी वाढून जंगलातील पशु-पक्ष्यांनाही उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे व स्वाती गावडे, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, यशोदा गावडे, पोलिसपाटील समृद्धी गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, संचिता सावंत, आशा सेविका उत्तरा नाईक तसेच सहदेव गावडे, लवू गावडे, हरिभाऊ गावडे, एकनाथ गावडे, महेश नाईक, तुकाराम गावडे, शरद गावडे, अजित अस्नोडकर, जानकी गावडे, स्मिता गावडे, रिया कविटकर, अंकिता गावडे आदी उपस्थित होते.
..
swt132.jpg
14989
बांदा ः सूर्यकांत चव्हाण यांचा सत्कार करताना डॉ. मिलिंद तोरसकर व इतर मान्यवर.
बांदा खेमराज प्रशालेतर्फे चव्हाण यांचा सत्कार
बांदाः गेली सलग दहा वर्षे विज्ञान प्रदर्शनात अव्वल कामगिरी करणाऱ्या बांदा खेमराज हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांचा धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. चव्हाण हे खेमराज हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून गेली १२ वर्षे कार्यरत आहेत. यावर्षी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात त्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीला जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच तालुका स्तरावर सलग दहा वर्षे प्रथम, जिल्हा स्तरावर सात वर्षे प्रथम क्रमांक तर तीन वेळा राज्य स्तरावर त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतींना यश मिळाले आहे. प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला. चिकाटीने काम करण्याची वृत्ती यश मिळवण्यासाठी प्रेरित करते, असे चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

