कचरा डेपो बनला जनावरांचा ‘मृत्युफास’
- rat१p२९.jpg-
२६O१४९८५
दापोली ः येथील काळकाईकोंड डम्पिंग ग्राउंडवर प्लास्टिक कचऱ्यात खाद्य शोधताना मोकाट जनावरे.
----
कचऱ्यात अडकले मुक्या प्राण्यांचे प्राण
काळकाईकोंड परिसरातील चित्र; प्लास्टिकमुळे आरोग्य धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १ ः दापोली नगरपंचायत क्षेत्रातील काळकाईकोंड परिसरातील डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्यामुळे मोकाट गुरे कचरा आणि तेथे असलेले प्लास्टिक खाताना दिसत आहेत. ही बाब जनावरांच्या आरोग्यासाठी घातक असून, मुक्या प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
काळकाईकोंड परिसरातील डंपिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या व बाटल्या, इतर घातक साहित्य उघड्यावर टाकले जात आहे. खाद्याच्या शोधात आलेली ही जनावरे प्लास्टिक पिशव्यांमधून खाद्य शोधताना प्लास्टिक पिशव्यांसहित हे खाद्य खात आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम घडून येत आहे. जनावराने प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावराच्या पचनसंस्थेत अडथळे निर्माण होतात ज्यामुळे प्रसंगी त्यांचा तडफडून मृत्यू होऊ शकतो. जर ही गुरे दूध देणारी असतील आणि दुर्दैवाने या गुरांचे दूध काढून कोणी दूध विक्री करत असेल तर प्लॅस्टिकमधील विषारी घटक मानवी साखळीत शिरगाव करू शकतात. डंपिंग ग्राउंडला तत्काळ संरक्षण जाळी किंवा कुंपण घालावे. कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून, प्लॅस्टिकसह इतर कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करावे. परिसरात सुरक्षारक्षक नेमण्यात यावा जेणेकरून जनावरे तिथे जाणार नाहीत, आदी उपाययोजना करून मुक्या जनावरांच्या जीविताशी होणारा खेळ थांबवावा आणि निसर्गसंवर्धनही केले जावे. तरी या गंभीर विषयाकडे दापोली नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

