संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी रत्नागिरीत कार्यक्रम
rat1p28.jpg-
26O14984
रत्नागिरी : संविधान अमृत महोत्सवी कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देताना अॅड. विलास पाटणे. डावीकडून अॅड. राहुल चाचे, अॅड. रत्नदीप चाचले, अॅड. शाल्मली आंबुलकर.
---
रत्नागिरीत आज संविधान अमृतमहोत्सव
अॅड. पाटणे ः ॲड. मिलिंद साठेंची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे येत्या शनिवारी (ता. ३) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती श्रीराम मोडक आणि महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल ॲड. मिलिंद साठे, जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
उद्या (ता.३) सायंकाळी ५.४५ वा. माळनाका येतील हॉटेल विवेक येथे हा कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात मोठे असलेले भारतीय संविधान राष्ट्राची कोनशिला आहे. भारतीय राज्यघटना सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज आहे. कुठल्याही संविधानाचे सरासरी आयुष्य वीस वर्ष आहे; मात्र भारतीय संविधानात ७५ वर्षे उलटूनही आज १४५ कोटी भारतीयांना एकत्र बांधण्याची ताकद आहे, असे अॅड. पाटणे म्हणाले.
संविधानाचा पहिला मसुदा १८९५ ला तयार झाला, त्याचे अभ्यासकर्ते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. १९१९ला केवळ ३ टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. साऊथ गोरस कमिटीसमोर ऐतिहासिक साक्ष संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आणि मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त लोकांना मिळाला पाहिजे, महिलांनाही मतदानाचा अधिकार असला पाहिजे असे म्हणणे मांडले, असे ॲड. पाटणे यांनी सांगितले.

