सावंतवाडी मदर क्वीन्सचा क्रीडा दिन उत्साहात

सावंतवाडी मदर क्वीन्सचा क्रीडा दिन उत्साहात

Published on

swt21.jpg
15087
सावंतवाडीः येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा क्रीडा दिनात सहभागी झालेले विद्यार्थी व मान्यवर.

सावंतवाडी मदर क्वीन्सचा क्रीडा दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात पार पडला.
क्रीडा दिनाच्या उद्घाटनप्रसंगी लेझीमच्या शिस्तबद्ध तालावर संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या चार दिवसीय क्रीडा महोत्सवात पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी हिटिंग द बॉटल, कोन जंपिंग, रनिंग, लंगडी रेस, पिकअप द पेपर विथ स्ट्रॉ, बुक बॅलन्सिंग, स्टॅच्यू गेम, चिकन रेस, बॉल इन द बास्केट, डॉज बॉल, स्टिक कॅचिंग, थ्रो बॉल, सॅक रेस, रिले आदी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांदरम्यान विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती, शिस्त आणि क्रीडा कौशल्याचा उत्तम प्रत्यय दिला. या स्पर्धा हाऊस ऑफ ऑनर, हाऊस ऑफ पर्सीवरन्स, हाऊस ऑफ ब्रेव्हरी आणि हाऊस ऑफ पीस या चार हाऊसेसमध्ये घेण्यात आल्या.
यात हाऊस ऑफ ऑनरने – प्रथम क्रमांक, हाऊस ऑफ ब्रेव्हरी – द्वितीय, हाऊस ऑफ पर्सीवरन्स – तृतीय तर हाऊस ऑफ पीस – चतुर्थ क्रमांक पटकाविला. क्रीडा दिनाच्या समारोपप्रसंगी सर्व हाऊसेसना संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते आकर्षक चषक प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सदस्य सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा दिनाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती इंतिजिया फर्नांडिस यांनी केले. क्रीडा शिक्षक श्री भूषण परब व सहशिक्षक श्री योगेश चव्हाण यांनी क्रीडा दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. क्रीडा दिनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, तसेच पालक–शिक्षक संघाने शाळेला शुभेच्छा दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com