तळवडेच्या विकासाठी कटीबध्द
swt23.jpg
15090
तळवडे ः भाऊचा धक्का ते बादेवाडी रस्ता कामाचे भूमिपूजन करताना मनिष दळवी. सोबत इतर मान्यवर व ग्रामस्थ.
तळवडेच्या विकासाठी कटीबध्द
मनिष दळवीः तीन रस्ता कामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिले. तळवडे गावातील ३१ लाख रुपये निधीच्या तीन महत्त्वाच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन दळवी यांच्या हस्ते झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच या कामांचा प्रारंभ करण्यात आला.
या निधीतून भवानी मंदिर ते मांजरेकर वाडी (१४ लाख), भाऊचा धक्का ते लोकेवाडी (७ लाख) आणि भाऊचा धक्का ते बादेवाडी (१० लाख) या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे गावातील वाड्यावस्त्या मुख्य प्रवाहात जोडल्या जाऊन दळणवळण सोपे होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष परब, तळवडे शक्ती केंद्रप्रमुख शंकर सावंत, आंबोली मंडळ सरचिटणीस दादा परब, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मांजरेकर, मंगलदास पेडणेकर, नम्रता गावडे, विकास गावडे, सुशांत गावडे, प्रवीण लोके, बाळू साळगावकर, रामा गावडे, दाजी तुळसकर, सुदन मांजरेकर, पोलीस पाटील मयुरी राऊळ, झिला वेंगुर्लेकर आणि विनय काणेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित रस्त्यांचे काम सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मनीष दळवी व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

