कोळोशी परिसरात बेवारस दुचाकी

कोळोशी परिसरात बेवारस दुचाकी

Published on

कोळोशी परिसरात
बेवारस दुचाकी
नांदगावः देवगड-निपाणी राज्य मार्गावर कोळोशी येथील चिटक्याच्या चाळ्यापासून काही अंतरावर चढावाला गेल्या अनेक दिवसांपासून एक दुचाकी बेवारस स्थितीत आहे. सुरवातीचे काही दिवस दुचाकीवर हेल्मेट होते. मात्र, ते गायब झाले आहे. त्यामुळे ही दुचाकी नेमकी कुणाची? ती चोरीची किंवा काही संशयास्पद तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. याबाबत पोलिस पाटील संजय गोरूले यांनी पोलिसात खबर दिल्याचे समजते.
-----------
सातार्डा विरंगुळा केंद्राबाबत
२६ ला उपोषणाचा इशारा
सावंतवाडीः सातार्डा येथील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राच्या इमारतीचा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ९.३० वाजता सहकाऱ्यांसमवेत उपोषणाला बसण्याचे निवेदन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर पेळपकर यांनी दिले आहे. विरंगुळा केंद्र इमारत बांधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे सातार्डा याठिकाणी विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला आहे. सातार्डा गावात विरंगुळा केंद्रासाठी जमीन उपलब्ध असताना प्रस्ताव सादर करून आठ वर्षे झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीचा खेळ मांडण्यात आला आहे. विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या लढ्याला नेहमी सहकार्य करणार असल्याचे माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी सांगितले.
--------------------

Marathi News Esakal
www.esakal.com