डीबीजेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता दूतांचा सन्मान

डीबीजेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता दूतांचा सन्मान

Published on

डीबीजेच्या स्वच्छता दूतांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘स्वच्छता संकल्प’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समाजात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच स्वच्छता दूतांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत चिपळूण नगरपालिकेतील स्वच्छता दूतांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारे स्वच्छता सुरक्षा साहित्य (हॅण्ड ग्लोव्हज) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांकडून वाटप करण्यात आले. स्वच्छता दूत हे समाजाच्या आरोग्याचे खरे शिल्पकार असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांनी स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्याचे सांगून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव, विनायक सावंत, प्रवीण जाधव, दीपक किंजळकर, रोहन सकपाळ आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com