बियाणी बालमंदिरमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

बियाणी बालमंदिरमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
Published on

-rat२p१६.jpg-
P२६O१५१५८
रत्नागिरी ः बियाणी बालमंदिरमधील छोट्या कलाकारांसमवेत डावीकडून धनश्री मुसळे, विनायक हातखंबकर, धनेश रायकर, अमित विलणकर, वर्षा ढेकणे आदी.
-----------
बियाणी बालमंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः भारत शिक्षण मंडळ संचलित बियाणी बालमंदिरमध्ये स्नेहसंमेलन नूतन नगराध्यक्षांच्या उपस्थितीत जल्लोषात झाले.
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा भारत शिक्षण मंडळ व बियाणी बालमंदिरच्यावतीने सत्कार करण्यात आला. मी या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान वाटतो. पालकांनी मुलांना मराठी शाळेतच घातले पाहिजे, असे त्यांनी निक्षून सांगितले. नगराध्यक्षांच्या हस्ते बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांना लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक, रोटरी क्लबचा नेशन बिल्डर अॅवॉर्ड आदी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरवण्यात आले. अपर्णा गोगटे यांना रोटरी क्लब रत्नागिरीतर्फे एक्सलन्स टीचर अॅवॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले.
कार्यवाह धनेश रायकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, विश्वस्त चंद्रकांत घवाळी, विनायक हातखंबकर, उपकार्याध्यक्ष सुनील वणजू, डॉ. चंद्रशेखर केळकर, सहकार्यावह श्रीकृष्ण दळी, सदस्य राजेंद्र कदम, संजय चव्हाण, संतोष कुष्टे, सनातन रेडीज, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका घाटविलकर, पंगेरकर आदी उपस्थित होते. भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी शुभेच्छा दिल्या. विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक नृत्याचे सादरीकरण केले. जाखडी, कोळीनृत्य असे बहरदार कार्यक्रम करून सर्वांची वाहव्वा मिळवली. दुसऱ्या दिवशी छोट्या गटाचे स्नेहसंमेलन झाले. या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनाला नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक अमित विलणकर उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षिका आसावरी पावसकर, ज्येष्ठ सेविका आरती केसरकर यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com