सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा
लोकमान्य वाचनालयातर्फे
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
साखरपा, ता. २ ः देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शांता अनंत साने यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. ११ जानेवारीला सकाळी ११ वा. वाचनालयाच्या हॉलमध्ये ही स्पर्धा होईल.
स्पर्धेसाठी आपल्या भारताचा वैभवशाली इतिहास, शूर वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई, मी वाचलेले आणि मला आवडलेले पुस्तक हे विषय देण्यात आले आहेत. वक्तृत्वासाठी किमान पाच ते कमाल सात मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख १ हजार ७५० रुपये आणि ५०० पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा निकाल स्पर्धेनंतर त्याच दिवशी लगेचच जाहीर होऊन बक्षीस वितरण होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी ७ जानेवारीपर्यंत वाचनालयात नावनोंदणी करावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

