कोकण
जिल्हा विज्ञान प्रदर्शनात खोपी हायस्कूलचे यश
विज्ञान प्रदर्शनात
खोपी हायस्कूलचे यश
खेड ः तालुक्यातील खोपी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्याप्रसारक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुष्का ढेबे व रवीना गोरे या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग विभागातून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. प्रशालेचे विज्ञान शिक्षक किरण जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्का व रवीना यांनी सादर केलेल्या सेंद्रिय शेतीवर आधारित प्रतिकृतीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. न्यू इंग्लिश स्कूल देवरूखमधील जिल्हास्तरीय प्रदर्शनातही त्यांनी प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण करत सुयश प्राप्त केले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष वसंत भोसले यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

