अॅप''च्या आधारे १,१९८ ग्राहकांकडून नावात बदल

अॅप''च्या आधारे १,१९८ ग्राहकांकडून नावात बदल

Published on

अॅप आधारे १,१९८ ग्राहकांकडून नावात बदल
महावितरणची ग्राहकांसाठी ऑनलाइन सेवा; घरबसल्या सेवांचा घेता येतो लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : वीजजोडणीनंतर नाव बदलाच्या अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरण कंपनीने सुरू केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १ हजार १९८ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल करून घेतला आहे. रत्नागिरीतील ५४ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार १४४ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत नावात बदल करून घेतला आहे.
महावितरण कंपनीने जीवन सुलभतेसाठी (इज ऑफ लिव्हिंग) वीजग्राहकांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. त्यानुसार महावितरणने वीजजोडणीच्या नावात बदल आणि मंजूरभार बदल यासाठी ऑनलाइन व झटपट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाइल अॅप अथवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजग्राहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज भरता येतो.
ग्राहकाला कोणत्या कारणासाठी नाव बदलणे आवश्यक आहे, त्याचा पर्याय निवडला की, त्यानुसार आवश्यक ते निवडक दाखले जोडावे लागतात. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर तीन ते सात दिवसात नावातील बदलाची प्रक्रिया पूर्ण होते.
महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भारवाढीच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला आहे. अस्तित्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये (Load Change/Demand Change) वाढ करणे किंवा कमी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
---
ग्राहकांनी नावात केलेला बदल
सिंधुदुर्ग - १,१४४
रत्नागिरी - ५४
---------------
एकूण - १,१९८
--------------------

चौकट
४८ तासांत वीजभार
वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येते. अशा ठिकाणी नवीन वीजमीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येतो. नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणीही साधारणतः ४८ तासांमध्ये वीजभार वाढीची प्रक्रिया पूर्ण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com