एचएसआरपी नंबरप्लेटसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ

एचएसआरपी नंबरप्लेटसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ

Published on

‘एचएसआरपी’साठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ
वाहनधारकांना मोठा दिलासा ; अपॉइंटमेंट बुकिंगचा पुरावा असल्यास कारवाई नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : राज्यात हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्यास शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही माहिती दिली. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुदतवाढ असल्याने अजून कुठेही दंडात्मक कारवाई सुरू केली नसल्याचे सांगण्यात आले.
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ अधिकृतपणे संपली असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे १ जानेवारीपासून राज्यभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आणि वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. आता ‘दादा’, ‘भाऊ’, ‘राजे’, ‘साहेब’ अशा फॅन्सी किंवा नियमबाह्य नंबरप्लेट्स यामुळे गायब झाल्या आहेत. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी बंधनकारक आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहने यांचा समावेश होतो. यापूर्वी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र आता कोणतीही अतिरिक्त सवलत दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते; परंतु अजूनही नंबरसाठी ऑनलाईन बुकिंग मिळत आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत बुकिंग मिळत असल्याने शासनाकडून तेवढी मुदतवाढ देण्यात आल्याचे येथील (आरटीओ) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर दंड आकारला जाणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष नंबरप्लेट बसवण्याची तारीख नंतरची असली तरी बुकिंगचा पुरावा असल्यास कारवाई होणार नाही.
एचएसआरपीला आता पर्याय नाही तर कायदेशीर बंधन आहे. आर्थिक दंड, कायदेशीर अडचणी आणि आरटीओ कामकाजातील अडथळे टाळायचे असतील तर एचएसआरपीला बसवणे हाच सुरक्षित मार्ग आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
---
नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचे स्वरूप
पहिली वेळ ः १ हजार रुपये दंड
पुन्हा नियमभंग ः ५ हजार ते १० हजार रुपये दंड
---
...असे आहे ‘एचएसआर’चे महत्त्व
* वाहनचोरी आणि बनावट नंबरप्लेट्स रोखता येणार
* प्रत्येक प्लेटला युनिक लेझर कोड आणि होलोग्राम असतो
* हा कोड थेट वाहननोंदणी डाटाबेसशी लिंक असतो
* नंबरप्लेट छेडछाड करणे जवळपास अशक्य होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com