डॉ. गोडकर यांना ‘कोकणरत्न पदवी’

डॉ. गोडकर यांना ‘कोकणरत्न पदवी’

Published on

15289

डॉ. गोडकर यांना ‘कोकणरत्न पदवी’
मालवण, ता. ३ : परुळे गाऊडवाडी (ता.वेंगुर्ले) येथील मूळ रहिवासी डॉ. प्रफुल्ल गोडकर यांना कोकण राज्य अभियानातर्फे मुंबई येथे कोकणरत्न पदवी पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकण राज्य अभियान संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार सचिन कळझुणकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. डॉ. गोडकर हे गेली अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसायात मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रातील मुलांना मार्गदर्शन व्हावे, म्हणून त्यांनी अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. कोकण परिसरातील अनेक सामाजिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयातून आरोग्य विषयक जागरूकतेचे कार्य ते अनेक वर्षे अविरतपणे करीत आहेत. डॉ. गोडकर हे गेली अनेक वर्षे नियमितपणे डिसेंबरमध्ये मालवण येथे येऊन आपल्या सेवेचा लाभ गरजू व होतकरू व्यक्तींना देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कोकणरत्न पदवी पुरस्काराने गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com