सावंतवाडीत आज इमारतीचे भूमिपूजन
सावंतवाडीत आज
इमारतीचे भूमिपूजन
सावंतवाडी ः महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ उद्या (ता. ४) सायंकाळी साडेपाचला येथील कार्यालय परिसरात होणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होईल. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर घारे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.
----
गांधी योजना समिती
कणकवलीत स्थापन
कणकवली ः तालुका संजय गांधी योजना समिती स्थापन करण्यात आली आहे. नवनिर्मित संजय गांधी योजना समितीची बैठक अध्यक्ष शरद कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संजय गांधी निराधार योजनेची ३४, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेची १३ व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. येथील तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीला तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, समिती सदस्य गौतम खुडकर, सुजाता हळदिवे, विजय भोगटे, विजय कातरुड, भगवान दळवी, दीपक दळवी, गुरुनाथ वर्देकर, गजानन शिंदे, संजय गांधी, नायब तहसीलदार जी. एम. कोकरे उपस्थित होते.
........................
वरळीत आजपासून
नृत्य-नाट्य आविष्कार
तळेरे : वरळीच्या नेहरू सेंटरतर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नववर्ष स्वागतानिमित्त ४ ते १६ जानेवारी या कालावधीत सायंकाळी सातला हा नृत्य नाटकांचा अविष्कार वरळीच्या नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
मुणगे सोसायटीची
आज वार्षिक सभा
मुणगे ः येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. ४) सकाळी १० वाजता भगवती हायस्कूल मुणगे येथे आयोजित केली आहे. या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विजय बोरकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

