सुशीला जोशींची समाजसेवा असामान्य
15410
सुशीला जोशींची समाजसेवा असामान्य
संजय वेतुरेकर ः देवगडमध्ये सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने दिला शिक्षक जाणारा यंदाचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ येथील शिक्षण व बालसंस्कार क्षेत्रात अनेक दशके योगदान दिलेल्या ज्येष्ठ शिक्षणसेविका सुशीला जोशी (वय ९३) यांना शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. ज्यांच्या पायावर नतमस्तक व्हावे, असे पाय समाजात फार कमी झाले आहेत. सावित्रीबाईंचा शिक्षणाचा वारसा पुढे नेणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा सन्मान करता आला याचे समाधान असल्याचे मत शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मंचावर सुशीला जोशी, श्री. वेतुरकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा सचिव समीर परब, जिल्हा महिला आघाडीप्रमुख सुश्मिता चव्हाण, सौ. शिरसाट आदी उपस्थित होते. सुशीला जोशी यांनी तत्कालीन लहान मुलांच्या शिक्षणाची फारशी व्यवस्था नसताना १९६६ च्या सुमारास बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून परिसरात शैक्षणिक चळवळ सुरू केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या चळवळीत सुमारे तीनपेक्षा अधिक दशके त्यांनी अखंड शिक्षणसेवा दिली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शिक्षक भारतीच्यावतीने यंदाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सुरूवातीला श्री. वेतुरकर यांनी त्यांना अभिवादन केले. सुश्मिता चव्हाण यांनी, बाईंनी केवळ ज्ञानार्जन केले नाही तर एक संस्कारित पिढी घडवल्याचे सांगितले. सुरेश सोनटक्के यांनी, दुसऱ्याच्या आनंदात, कल्याणात त्यांनी स्वतः समाधान शोधले. तत्कालीन प्रतिकुल परिस्थितीत आव्हाने झेलत इतरांना आधार देण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. शामसुंदर जोशी यांनी, पुरस्कार शोधत इथपर्यंत आल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सुनील आठवले, प्रमोद नलावडे, विद्या माणगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री. आडेलकर यांनी धावता आढावा घेतला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, प्रियांका साळसकर, तृप्ती पारकर, मधुकर नलावडे, मिलिंद कुबल, शामल जोशी, सुषमा देसाई यांच्यासह अन्य उपस्थित होते. भूषण दातार यांनी आभार मानले.
.........................
सावित्रीबाईंचा वारसा जोशींनी जपला
पुरस्कार वितरण करताना वात्सल्य आणि सात्विक भाव नजरेसमोर दिसतात. त्यांचे विद्यार्थी म्हणजे त्यांची मुलेच असल्याचा भास होतो. त्यांच्यासारखी समाजातील व्यक्तिमत्वे आज कमी होत चालली आहेत. सावित्रीबाईंचा वारसा त्यांनी पुढे नेला असून पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याचे समाधान असल्याचे श्री. वेतुरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

