रत्नागिरीःजिल्हा पुरवठा अधिकारी यांची गुरुप्रसाद संस्थेला मदत

रत्नागिरीःजिल्हा पुरवठा अधिकारी यांची गुरुप्रसाद संस्थेला मदत

Published on

rat4p10.jpg-
15498
रत्नागिरी ः येथील गुरुप्रसाद संस्थेच्या अध्यक्षांकडे ब्लॅकेट सुपूर्द करताना पुरवठा अधिकारी सौ. रजपूत यांचा मुलगा.
----------------
जिल्हा पुरवठा अधिकारी यांची गुरुप्रसाद संस्थेला मदत
सामाजिक बांधिलकी जपत २० ब्लॅकेट संस्थेकडे सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः शहरातील गुरुप्रसाद संस्थेतर्फे नुकत्याच झालेल्या एडस दिनानिमित्त अंत्योदय अन्न योजनेचा कॅम्प घेण्यात आला. अंत्योदय अन्न जो योजनेची एकूण २१ प्रकरणे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहणी रजपूत यांच्याकडे देण्यात आली. हा कार्यक्रम टिळक आळी येथील मंगल कार्यालयात झाला. यावेळी त्यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त सहजीवन जगणाऱ्यांसाठी २० ब्लॅकेट संस्थेकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गुरुप्रसाद संस्थेच्या कर्मचारी मिरा चव्हाण या जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रजपूत यांच्या संपर्कात होत्या. अंत्योदय अन्न योजना ही सहजीवन जगणाऱ्यांसाठी एक उपयुक्त योजना आहे. ही योजना मिळवून देताना सुद्धा अनेक वेळा अडचणीचा सामना करावा लागतो. मिरा चव्हाण यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वेळोवेळी त्यांचे सहकार्य घेतले. तालुक्यातील सहजीवन जगणाऱ्यांसाठी ही योजनेचा प्रसार केला. तसेच गुरुप्रसाद संस्थेच्या कामाची माहिती दिली. त्यावेळी सौ. राजपूत यांनी सहजीवन जगणाऱ्यांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रोहणी रजपूत यांनी संस्थेतील दोन मुलींना टायपिंग आणि शिवणक्लास यासाठी मदत केली. त्या दोन्ही मुली आता स्वतः नोकरी करुन कमवत्या झाल्या आहेत.
दरम्यान आठवडाभरापूर्वी गुरुप्रसाद संस्थेने जागतिक एडस दिनानिमित्त एक अंत्योदय योजनेसाठी शिबिराचे नियोजन केले. त्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रोहणी राजपूत आणि रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी निशा आणि त्यांचे सहकारी जातीने हजर होते. त्यांनी एडस सहजीवन जगणाऱ्या रुग्णांसाठी मार्गदर्शनही केले होते. त्या शिबिरात अंतोदय अन्न योजनेची एकूण २१ प्रकरणे जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी निशा यांच्याकडे देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसा निमित्ताने १० वर्षापर्यंतच्या मुलांना ब्लॅंकेट देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सौ. रजपूत यांनी २० ब्लॅंकेट संस्थेकडे सुपूर्द केली.
-----------
चौकट...
संस्थेकडून मदतीचे आवाहन
गुरुप्रसाद संस्था गेली अनेक वर्षे जिल्ह्यात एडस सहजीवन जगणाऱ्या रुग्णांसाठी काम करत आहेत. कोणी जर या दुर्धर आजारातील सहजीवन जगणाऱ्या लोकांसाठी मदत करणाऱ असेल तर त्यांनी गुरुप्रसाद संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थाचे अध्यक्ष मिलींद राजवाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com