विद्यार्थ्यांची ''तांबाळ'' पर्यटन केंद्रास क्षेत्र भेट
swt513.jpg
15658
माड्याचीवाडी ः इंग्रजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी तांबाळ कृषी पर्यटन केंद्रास भेट दिली.
विद्यार्थ्यांची ‘तांबाळ’ पर्यटन केंद्रास क्षेत्र भेट
कुडाळ इंग्रची शाळेचा उपक्रम पारंपरिक जीवनशैली, शेतीचा घेतला आनंद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः येथील इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी माड्याचीवाडी येथील तांबाळ कृषी पर्यटन केंद्रास भेट दिली. या क्षेत्रभेटीत सातवीचे विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तेथे कोकणातील पारंपरिक जीवनशैली, शेतीचे अनुभव, औषधी वनस्पती, नक्षत्र वन या गोष्टींचा आनंद घेतला.
तांबाळ येथील मातीच्या घरांमध्ये मातीच्या, लाकडाच्या सजावटीच्या वस्तू, मातीपासून बनवलेला बेड यासारख्या विविध गोष्टी, विविध औषधी वनस्पतींसह पूर्वीच्या काळी असलेले ग्रामीण राहणीमान विद्यार्थ्यांना पाहता आले. या ठिकाणी ससे, कोंबडी हे प्राणी व पक्षी देखील पाहायला मिळाले. ''नक्षत्र वना''मध्ये बारा राशींनुसार प्रत्येक राशीसाठी कोणत्या वृक्षाची आराधना करावी तसेच त्या राशींसंबंधी इतर माहिती देखील मिळाली. पूर्वीच्या काळी शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे, धान्य साठवणुकीच्या पद्धती, जुनी नाणी, जुनी पितळेची तांब्याची भांडी, जुने दूरध्वनी, मुसळ लाकडापासून बनलेल्या गणपती, श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा, पूर्वी मासेमारीसाठी वापरले जाणारे साधन यांसारख्या कितीतरी प्राचीन वस्तू पुरातन वस्तुसंग्रहालयात विद्यार्थ्यांना पाहता आल्या. तेथील आजूबाजूच्या परिसरात बांबूसह विविध नैसर्गिक वस्तूंच्या बनवलेल्या वस्तू पाहायला मिळाल्या. काजू, सुपारी, नारळ यांची झाडे, पालेभाज्या, फळभाज्या, फळझाडे, विविध वेलींचे प्रकार, बटाटे, लसूण, भुईमूग देखील विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.
तुषार पांचाळ व नीलेश देसाई यांनी विद्यार्थ्यांना शेती विषयक माहिती तसेच शेती लागवडीच्या पद्धतींची माहिती दिली. भाजीची लागवड कशी करावी, याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी दाखविले. विविध बियाणे जतन करण्याची पद्धत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनशैलीची तसेच पूर्वीच्या राहणीमानाची, शेती लागवडी यांसारख्या गोष्टींविषयी माहिती मिळाली. यावेळी मुख्याध्यापिका मुमताज शेख, सहायक शिक्षक रियाज शेख, वैशाली शेट्टी, पूर्वा राऊळ, सूरज गोसावी, दिव्या खानोलकर, पूजा खानोलकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

