अन्यायाविरोधात ''क्रांतिज्योत'' पेटवा

अन्यायाविरोधात ''क्रांतिज्योत'' पेटवा

Published on

swt59.jpg
15667
शेर्ले ः सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात बोलताना ॲड. स्वाती पालेकर. शेजारी दिलीप जाधव, मीनाक्षी तेंडुलकर, प्रांजल जाधव व इतर मान्यवर.

अन्यायाविरोधात ‘क्रांतिज्योत’ पेटवा
ॲड. स्वाती पालेकरः शेर्लेत सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी वंदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः शिक्षणाचा पाया रचून अनंत अडचणींवर मात करत मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आजची स्त्री सर्व क्षेत्रांत सक्षम बनली आहे; मात्र अन्यायाविरोधात पेटून उठल्याशिवाय स्त्री अबला ठरण्याची भीती कायम राहील, असे मत ॲड. स्वाती पालेकर यांनी शेर्ले येथे व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभा, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने शेर्ले सिद्धार्थनगर येथे आयोजित सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिन कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुमेधा जाधव होत्या. यावेळी व्यासपीठावर बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव, तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर, तालुका सचिव चंद्रशेखर जाधव, जिल्हा महिला सचिव मानसी कदम, पोलिसपाटील विश्राम जाधव, सरपंच प्रांजल जाधव, मीनाक्षी पवार, सुवर्णा तेंडुलकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्थानिक महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओवी सादर केली. ॲड. पालेकर यांनी स्त्रीविषयक विविध शासकीय कायद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संविधान, हुंडाबळी प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, समान वेतनाचा हक्क, पोक्सो कायदा, हिंदू मॅरेज ॲक्ट आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली.
मीनाक्षी तेंडुलकर यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला. तालुकाध्यक्ष जाधव यांनी बौद्ध महासभेच्या विविध उपक्रमांची माहिती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या संस्थेत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी सरपंच प्रांजल जाधव, शरण्य जाधव, शर्वरी जाधव, प्रणाली जाधव, दिव्यांका जाधव, वीरतिका जाधव, वेदिका जाधव, दुर्वा जाधव आदी बालिकांनी सावित्रीबाईंचा पेहराव करून त्यांच्या जीवनकार्याचे सादरीकरण केले. गौतमी कांबळे यांनी आभार मानले. मान्यवरांचे स्वागत जागृती जाधव यांनी, सूत्रसंचालन ममता जाधव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com