कबड्डीत खेर्डी, निकम हायस्कूलने विजेतेपद
- rat५p९.jpg-
२६O१५६७०
सावर्डे : विजयी संघांना पारितोषिक देताना सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक आणि अन्य.
----
कबड्डीत खेर्डी, निकम हायस्कूलला विजेतेपद
सह्याद्री शिक्षणसंस्थेअंतर्गत क्रीडा स्पर्धा; खो-खोमध्ये खांडोत्रीसह वेळणेश्वरचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ५ : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे सह्याद्री शिक्षणसंस्थेतर्गत क्रीडा स्पर्धेत कबड्डीत मुले गटात खेर्डी हायस्कूल तर मुलींच्या गटात गोविंदराव निकम सावर्डे हायस्कूलने विजेतेपद पटकावले. तसेच खो-खोमध्ये मुलांच्या गटात खांडोत्री हायस्कूल तर मुलींच्या गटात वेळणेश्वर हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळवला.
सावर्डे येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या वेळी सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कास्यपदक व प्रमाणपत्रे तर सांघिक क्रीडा प्रकारांतील संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धांचे सविस्तर निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे) - कबड्डी मुले : खेर्डी हायस्कूल, टाळसुरे हायस्कूल, सावर्डे हायस्कूल. मुली : सावर्डे हायस्कूल, खेर्डी हायस्कूल, नांदगाव हायस्कूल. खो-खो मुले : खांडोत्री हायस्कूल, वेळणेश्वर हायस्कूल, सावर्डे हायस्कूल. मुली : खांडोत्री हायस्कूल, निवळी हायस्कूल, सावर्डे हायस्कूल. व्हॉलीबॉल मुले : आंबडस हायस्कूल, निवळी हायस्कूल, सवेणी हायस्कूल. मुली : धामापूर हायस्कूल, निवळी हायस्कूल, असुर्डे हायस्कूल. ४ बाय १०० मीटर रिले मुले : वेळणेश्वर हायस्कूल, असुर्डे हायस्कूल, सावर्डे हायस्कूल. मुली : निवळी हायस्कूल, सावर्डे हायस्कूल, वेळणेश्वर हायस्कूल. अॅथलेटिक्स – मुले १०० मीटर : दिव्य नाटेकर (वेळणेश्वर), प्रथम शिगवण (असुर्डे), साई दिवाळे (सावर्डे). २०० मीटर : विपुल साळवी (असुर्डे), सर्वेश खापरे (सावर्डे), मंथन वारे (कोसबी फुरूस). ४०० मीटर : निखिल टेमकर (मांदिवली), शौर्य खापरे (सावर्डे), चिंतन सावंत (मांदिवली). ८०० मीटर : प्रथम शिगवण (असुर्डे), प्रांजल आंबेडे (खेर्डी), परिणय पवार (खांडोत्री). १५०० मीटर : वीर मेटकर (खेर्डी), विपुल साळवी (असुर्डे), शौर्य खापरे (सावर्डे).
गोळाफेक : मानव डिके (निवळी), सोहम चव्हाण (नांदगाव), सार्थक राबाडे (वाशी). थाळीफेक : अलोक कुडतडकर (धामापूर), प्रथम शिगवण (असुर्डे), सोहम चव्हाण (नांदगाव). भालाफेक : निखिल टेमकर (मांदिवली), विराज सावंत (निवळी), अलोक कुडतडकर (धामापूर). उंच उडी : कुलदीप खांबे (मांडकी), सोहम जोशी (सावर्डे), संकेत तेगडे (निवळी). गोळाफेक: सिद्धी थोरे (टाळसुरे), प्रणाली मोरे, सृष्टी खेराडे (खांडोत्री). थाळीफेक : सृष्टी खेराडे (खांडोत्री), रिया कांबळे (तोंडली), दिव्या पवार (तोंडली). भालाफेक ः कस्तुरी भानसे (मांदिवली), सृष्टी खेराडे (खांडोत्री), नंदिनी कांबळे (तोंडली). उंच उडी : जान्हवी हुमणे (मांदिवली), निधी शिगवण (कोसबी फुरूस), सलोनी भानसे (मांदिवली).
-----
चौकट
इच्छा भिंगे ठरली वेगवान धावपटू
मैदानी क्रीडाप्रकाराचा (अॅथलेटिक्स) निकाल – मुली १०० मीटर : इच्छा भिंगे (खेर्डी इंग्लिश मीडियम), प्रांजल हुमणे (निवळी), दीक्षा कांबळे (तोंडली). २०० मीटर : मुक्ता भुवड (सावर्डे), भक्ती शिगवण (निवळी), शामिली पावरी (वेळणेश्वर). ४०० मीटर : हस्ता कदम (असुर्डे), रिया भानसे (मांदिवली), स्वरा राणीम (सावर्डे). ८०० मीटर : हुमेरा सय्यद (सावर्डे), इच्छा राजभर (सावर्डे), कस्तुरी भानसे (मांदिवली). १५०० मीटर : हुमेरा सय्यद (सावर्डे), कस्तुरी भानसे (मांदिवली), सलोनी भानसे (मांदिवली).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

