''मेरी पंचायत अॅप'' द्वारे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीची एका क्लिकवर माहिती

''मेरी पंचायत अॅप'' द्वारे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीची एका क्लिकवर माहिती

Published on

‘मेरी पंचायत’ अॅपमध्ये गावकारभाराचा आरसा
८४६ ग्रामपंचायतींचा समावेश ; पंचायतराज मंत्रालयाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने मेरी पंचायत अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना पंचायतीचा कारभार घरबसल्या एका क्लिकवर समजणार आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये हे अॅप दिसणार आहे.
केंद्र तसेच राज्यशासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी, आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत काय विकास सुरू आहे, गावात कोणत्या योजना आल्या आहेत, शासनाकडून किती निधी मिळाला आदी माहिती सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने मेरी पंचायत अॅप आणले आहे. हे अॅप हे केंद्र सरकारचे एक डिजिटल व्यासपीठ आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीचा कारभार, विकासकामे, निधीचा वापर आणि विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप ग्रामीण भागात ई-गव्हर्नन्स सुधरण्यासाठी पंचायतीच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी पंचायतराज मंत्रालयाने विकसित केले आहे.
स्थानिक पातळीवरील एखाद्या विकासकामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकता तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक समोर आणता येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे. या अॅपने आर्थिक बाबीचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामस्थांसमोर येणार आहे. त्यामुळे आपल्या गावांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन वेळ घालवावा लागणार नाही.
--------
चौकट
माहितीचे स्रोत
मेरी पंचायत अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य किती याची माहिती मिळेल. एकूण किती समित्या स्थापन केल्या असून, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, नोटीस बोर्डाच्या माध्यमातून ग्रामस्थांना काय सूचना दिल्या आहेत, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे, कोणत्या योजनेतून विकासकामे सुरू आहेत, ग्रामपंचायतीची एकूण बॅंकखाती किती आहेत, कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च केली, गावात पाण्याचे स्रोत व नळकनेक्शन किती आहेत, याची माहिती कळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com