रत्नागिरी- पहिल्याच दिवशी ३१ हजार रक्तकुपिकांचे संकलन
- rat५p११.jpg-
२६O१५६७९
नाणिजधाम येथे रविवारी आयोजित केलेले रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
---
पहिल्या दिवशी ३१ हजार रक्तकुपिकांचे संकलन
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य ; विविध ठिकाणी ३२२ शिबिरांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ५ ः जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘जीवनदान महाकुंभ’ अर्थात महाविशाल रक्तदान अभियानाची सुरुवात आज झाली. पहिल्याच दिवशी ३१ हजारांपेक्षा अधिक रक्तकुपिका संकलित झाल्या असून, ३२२ शिबिरांमधून हे रक्त संकलित झाले आहे.
जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या आध्यात्मिक प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जीवनदान महाकुंभाअंतर्गत १८ जानेवारीपर्यंत देशभरात हा उपक्रम चालू राहणार आहे. या कालावधीत लाखो रक्तकुपिका संकलित करण्याचा संकल्प आयोजकांनी केला असून, गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा हा उपक्रम आरोग्यक्षेत्रासाठी एक मोठे बळ ठरणार आहे.
जगद्गुरूंच्या आदेशात समाजपरिवर्तनाची ताकद आहे. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्यावर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जनतेचे अतूट प्रेम, श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यांच्या एका आवाहनावर समाज मोठ्या संख्येने संघटित होतो, हे या अभियानातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यांच्या आदेशात असलेली आध्यात्मिक व सामाजिक परिवर्तनाची ताकद या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून येत आहे. अध्यात्म आणि समाजसेवेचा सुंदर संगम रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम हे केवळ आध्यात्मिक केंद्र नसून, समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि मानवकल्याणाचे एक सशक्त माध्यम बनले आहे. रक्तदानासारख्या संवेदनशील व अत्यावश्यक विषयावर इतक्या व्यापक प्रमाणावर जनजागृती करून प्रत्यक्ष कृती घडवून आणणे, हे या पिठाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

