चिपळूण ः एकपात्री अभिनय स्पर्धेत रश्मी मोरे प्रथम
- rat५p२.jpg ः
२६O१५६३४
चिपळूण ः यशस्वी स्पर्धकांना गौरवताना अॅड. मीनल ओक यांच्यासोबत परीक्षक भगवान नारकर.
----
एकपात्री अभिनयात रश्मी मोरे प्रथम
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा ; द्विपात्रीत सावंत, मोरे अव्वल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. एकपात्री अभिनय स्पर्धेत रश्मी मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्विपात्री अभिनय स्पर्धेत रंजना सावंत व रश्मी मोरे या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला.
शालेय व खुल्या गटापुरत्या मर्यादित न राहता केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी अभिनय स्पर्धा घेण्याचा संकल्प अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केला असून, तो यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. एकपात्री गटात रश्मी मोरे (प्रथम), पुष्पावती पाटील (द्वितीय), अनिल सोमण (तृतीय) यांनी यश मिळवले. संगीता पालकर व शोभा वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. द्विपात्री गटात रंजना सावंत व रश्मी मोरे (प्रथम), सुनीत्र आपटे व संजय शिंदे (द्वितीय), अभय दांडेकर व भालचंद्र कदम (तृतीय) यांनी यश मिळवले. स्नेहल दीक्षित व मेघना चितळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. नेत्रा आपटे यांना परीक्षक डॉ. भगवान नारकर यांच्या हस्ते विशेष अभिनय पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कडवई येथील सिने-नाट्यकलाकार डॉ. भगवान नारकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप आंब्रे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरणावेळी नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेवक निहार कोवळे, परीक्षक डॉ. भगवान नारकर, अभिनय स्पर्धेच्या प्रमुख अॅड. विभावरी रजपूत आणि नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

