‘संस्कार’तर्फे १६ पासून देवगडात व्याख्यानमाला
‘संस्कार’तर्फे १६ पासून
देवगडात व्याख्यानमाला
देवगड : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसवर्धक मंडळ आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ या कालावधीत तीन दिवसीय ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ग्रंथालयासमोरील पटांगणावर व्याख्यानमाला होणार आहे. यात १६ ला पुणे येथील अजित पाटणकर यांचे ‘अणुऊर्जा : भारत आणि जगभरात सुरू असलेले प्रयोग’, १७ ला तळेरे (ता. कणकवली) येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : एक द्रष्टा युगपुरुष’, १८ ला कुडाळ येथील सचिन भाटवडेकर यांचे ‘पसायदान : विश्वकल्याणाची प्रार्थना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक ॲड. अजित गोगटे, तसेच तिन्ही संस्थांचे अध्यक्ष गुरुदेव परूळेकर, चारुदत्त सोमण आणि विद्याधर माळगावकर यांनी केले आहे.
....................
बौद्ध वधू-वर पालक
मेळावा फेब्रुवारीमध्ये
सावंतवाडी ः निवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ, सिंधुदुर्गमार्फत ८ फेब्रुवारीला सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे बौद्ध वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. सहभागी होण्याचे आवाहन निवृत्त बौद्ध अधिकारी-कर्मचारी संघाचे सचिव मिलिंद पै, अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी केले आहे. सकाळी साडेनऊला नावनोंदणी सुरू होणार आहे. नावनोंदणीसाठी कुडाळ-सिद्धार्थ कदम, आर. डी. कदम, देवगड-आनंद देवगडकर, सुहास कदम, कणकवली-मिलिंद सरपे, सिद्धार्थ तांबे, मालवण-आनंद सावळे, रुपाली पेंडूरकर, आरती कदम, सावंतवाडी-मोहन जाधव, ममता जाधव, वेंगुर्ले-अशोक सावळे, गजानन जाधव, वैभववाडी-भास्कर जाधव, दोडामार्ग-एम. बी. कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
...................
कुडाळात १७ ला
वक्तृत्व स्पर्धा
कुडाळ ः कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे १७ जानेवारीला सकाळी १० वाजता येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयामध्ये (जिल्हा ग्रंथालय) तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा तालुका मर्यादित असून प्रथम १०००, द्वितीय ७००, तृतीय ५०० व उत्तेजनार्थ ३०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा ही नववी ते बारावी या गटामध्ये होणार आहे. सादरीकरणासाठी सात मिनिटांची वेळ असेल. स्पर्धेसाठी ‘सोशल मीडिया-चिंता व चिंतन’, ‘मोबाईल-विधायक की विघातक?’, ‘भारतीय शेतकरी-बळी की राजा?’ यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाने सादरीकरण करायचे आहे. इच्छुकांनी पत्रकार समितीचे खजिनदार अजय सावंत यांच्याकडे १५ जानेवारीपर्यंत नावे द्यावीत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष विजय पालकर, सचिव विठ्ठल राणे यांच्याशी संपर्क साधावा.
....................
गोसावी समाजाची
कुडाळात २४ ला सभा
कणकवली ः नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाची विशेष सभा २४ जानेवारीला दुपारी अडीचला कुडाळ येथील श्री सिद्धिविनायक हॉलमध्ये आयोजित केली आहे. या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. या बैठकीसंदर्भातील लेखी सूचना तीन दिवस आधी मंडळाकडे पाठवाव्यात. सभेला सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
.........................
मठ अनभवनेश्वर
जत्रोत्सव आज
वेंगुर्ले ः तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील श्री देव-अनभवनेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ८) आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी नऊपासून धार्मिक विधी, अकराला सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व रात्री साडेनऊला वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. जत्रोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.
......................
केळूस येथे मार्चमध्ये
सामाजिक नाट्य स्पर्धा
वेंगुर्ले ः केळूस-कालवीबंदर येथील नवतरुण उत्साही नाट्य कला, क्रीडा मंडळ, विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिती व कालवी ग्रामस्थांतर्फे २२ वर्षे घेण्यात येत असलेली मराठी सामाजिक नाटक स्पर्धा यावर्षी १९ ते २६ मार्च या कालावधीत आयोजित केली आहे. या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
कणकवलीत २० ला
निवृत्तांचा स्नेहमेळावा
कुडाळ ः राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना सभासदांचा स्नेहमेळावा २० जानेवारीला सकाळी दहाला कणकवली येथील गणेश मंदिरनजीकच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

