मालवणच्या विकासाचा ध्यास घ्या
16073
मालवणच्या विकासाचा ध्यास घ्या
भाई गोवेकर ः भंडारी समाजातर्फे नगराध्यक्षांसह, नगरसेवकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा. मालवण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करा. समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांनी येथे केले.
सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण व भंडारी ज्ञातीबांधव यांच्यावतीने मालवणच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता वराडकर आणि नवनिर्वाचित नगरसेवकांसह विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या समाजातील मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार सोहळा भरड येथील लीलांजली सभागृहात झाला. श्री. गोवेकर यांच्या हस्ते हा मुख्य सत्कार करण्यात आला. यावेळी भंडारी समाजाचे अध्यक्ष रवींद्र मालवणकर, उद्योजक चंद्रशेखर मोर्वेकर, भाई सारंग, नीलेश मांजरेकर, अविनाश मालवणकर, जयप्रकाश परुळेकर, निखिल वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात नगराध्यक्षा वराडकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर व भाग्यश्री मयेकर यांचा शाल, श्रीफळ आणि रोप देऊन गौरव करण्यात आला. समाजाच्यावतीने डास निर्मूलन, वाहतूक नियोजन, कचरा व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील व्यपाऱ्यांच्या सुविधा यांसारख्या शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
येथील विमा प्रतिनिधी सतेजा बोवलेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण शाखेने मिळविलेल्या यशाबद्दल, मालवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदेश मयेकर यांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी पतपेढीवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सुमित मसुरकर यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रदीप वेंगुर्लेकर, राजेंद्र आंबेरकर, पंकज पेडणेकर, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, देवदत्त हडकर, सागर हडकर, सचिन गवंडे, अशोक मयेकर, चिमाजी मसुरकर, बाळा सोन्सुरकर, पप्या कद्रेकर, मिलिंद झाड, विनोद बिले उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रसन्न मयेकर यांनी केले. सुनील नाईक यांनी आभार मानले.
..................
समाज हितासाठी जोडे बाजूला ठेवू
नगराध्यक्षा वराडकर म्हणाल्या, ‘समाजाने केलेल्या या सत्कारामुळे मी भारावून गेले आहे. जेव्हा समाजाला गरज लागेल, तेव्हा मी आणि माझे सहकारी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे स्पष्ट केले.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

