‘बाल महोत्सव’ निराश्रितांचे व्यासपीठ
16132
‘बाल महोत्सव’ निराश्रितांचे व्यासपीठ
तृप्ती धोडमिसे ः सिंधुदुर्गनगरीत जिल्हास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः ‘समाजाच्या मुख्य प्रवाहातील बालकांना शिक्षण, कला व कौशल्य विकासाच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. मात्र, निराधार व निराश्रित बालकांना या संधी हमखास मिळतीलच, असे नाही. अशा बालकांच्या कला, क्रीडा व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरत आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, बाल विकास प्रकल्प अधिकारी मनोज भोगटे, आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, बालकल्याण समिती सदस्य अॅड. अरुण पणदूरकर, प्रा. माया रहाटे, अमर निर्मळे, बाल न्याय मंडळ सदस्य कृतिका कुबल, सदस्य, ओरोस बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश ओरोसकर, उपाध्यक्ष अनुष्का ओरोसकर, सदस्य स्वाती ओरोसकर, मुख्याध्यापिका हर्षाली पाटणकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रमाकांत परब, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडुरंग मालवणकर, ग्राम विस्तार अधिकारी श्री. चव्हाण, मुलांचे निरीक्षणगृह बालगृह वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद बोर्डवेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. बालगृहातील मुलांना प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानित केले. उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिनगारे यांनी प्रास्ताविक केले. अधीक्षक बी. जी. काटकर यांनी आभार मानले.
---
‘महोत्सवातील सहभाग आनंददायी!’
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘मुलांना घडविणे हे शिक्षक व पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा बाल महोत्सवांची नितांत गरज आहे. या महोत्सवात बालकांचा उत्स्फूर्त सहभाग आनंददायी आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

