-युडीआयडी कार्डसाठी १५ ला उपजिल्हा रूग्णालयात शिबीर
युडीआयडी कार्डसाठी दापोलीत १५ ला शिबिर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ७ ः विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांसाठी युडीआयडी कार्ड काढण्यासाठी १५ जानेवारीला दापोली उपजिल्हा रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२५ पासून दरमहा २ हजार ५०० रुपये अदा करण्यात येतात. अर्थसहाय्य दिव्यांग लाभार्थ्यांना देण्याकरिता शासनाकडून एसएएस प्रणालीमध्ये संबंधित लाभार्थ्यांचा युडीआयडी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन दिलेला नंबर घेणे आवश्यक आहे तसेच सदरच्या युडीआयडीला संबंधित लाभार्थ्यांचे आधारकार्ड मॅपिंग/लिंक असणे गरजेचे आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना आरोग्य विभागाकडून यापूर्वी ऑफलाईन अपंग प्रमाणपत्र दिलेले नाही अशा लाभार्थ्यांना युडीआयडी काढण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे १५ जानेवारीला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. युडीआयडी काढण्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्यकेंद्र अथवा ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांच्यामार्फतही https://swavlambancard.gov.in या वेबलिंकवर आवश्यक त्या माहितीसह ऑनलाईन अर्ज दिव्यांग लाभार्थ्यांचे नातेवाईक/हितचिंतक यांच्यामार्फत १५ जानेवारीपूर्वी करावा जेणेकरून शिबिराच्या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ वाचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

