

- rat७p१७.jpg-
P२६O१६१५५
रत्नागिरी ः आंबाकलमांवरील मोहोर काळा पडू लागला आहे.
- rat७p१८.jpg-
P२६O१६१५६
थंडी वाढू लागल्याने पुन्हा मोहोर येत आहे.
(संजय पंडित ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
मोहोराचा बहर, पण फलधारणेत घट
हापूसची स्थिती ; थंडीच्या कडाक्यामुळे दहापट मोहोर, करप्याचा प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः पाऊस लांबल्यामुळे थंडी पडण्यास उशीर झाला; मात्र डिसेंबर महिन्यात किमान तापमानाचा कालावधी अधिक राहिल्यामुळे हापूस कलमांना दहापट अधिक मोहोर आला होता; परंतु अपेक्षित फलधारणा न झाल्याने या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित मिळेल की नाही, याबाबत बागायतदारांमधूनच शंका उपस्थितीत होत आहे. ७० टक्केहून अधिक मोहोर वांझ (फलधारणा न झालेला) निघाल्याचे बागायतदारांचे मत आहे तसेच दोन दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढलेला असून, मोहोर काळा पडत आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किमान पारा २१ अंशावर आला होता. त्यामुळे थंडीचा जोर ओसरू लागला. दिवसाही उष्मा जाणवू लागलेला होता. मागील आठ दिवसात हे वातावरण होते; परंतु गेल्या दोन दिवसात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागलेला आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या नोंदीनुसार पारा पुन्हा ९ अंशापर्यंत खाली आलेला आहे. यंदा दापोलीत किमान पाऱ्याची नोंद सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेली आहे. कोकणात जानेवारी महिन्यात अधिक थंडी जाणवते. यावर्षी एक महिना आधीच थंडीचा कडाका होता. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही झालेला होता. ग्रामीण भागात शेकोट्या ठिकठिकाणी पेटलेल्या पाहायला मिळत होत्या. तसेच थंडीमुळे सर्दी-खोकल्यासारख्या आरोग्यविषयक तक्रारीही वाढता आहेत.
वाढलेल्या थंडीचा परिणाम हापूसच्या उत्पादनावर होत आहे. पाऊस लांबल्यामुळे यंदा हंगाम एक महिना विलंबाने सुरू होणार आहे. यावर्षी हापूसला प्रचंड मोहोर आलेला असला तरीही, सेटिंग कमी होताना दिसत आहे. हा अतिथंडीचा परिणाम असल्याचे बागायतदारांचे मत आहे. ७५ टक्के मोहोर वांझ असून, अवघ्या १५ ते २० टक्के मोहोराचे सेटिंग होत आहे. त्यातून उत्पादन किती मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. संक्रांतीच्या दरम्यान येणाऱ्या मोहोरावर मे महिन्यातील उत्पादनाचे गणित अवंलबून राहील तसेच गेले दोन दिवस किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे मोहोरावर अळी, तुडतुडा पडलेला आहे. सकाळी धुके पडल्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मोहोर काळा पडला असून, त्यामधून उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.
----
कोट १
यंदा हापूस कलमांना मोहोर भरपूर आलेला आहे. मोहोराला होणाऱ्या फलधारणेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उत्पादन कमी होणार हे निश्चित आहे. थंडी वाढत असल्याने पुन्हा मोहोर येण्याची शक्यता आहे. त्यावर अखेरच्या टप्प्यातील गणित अवलंबून आहे.
- उमेश रहाटे, आंबा बागायतदार
-----
चौकट १
असा आहे हवामानाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत कमाल तापमान ३२ व ३३ अंश सेल्सिअसदरम्यान तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअमदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांमध्ये सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६-६८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८-५२ टक्के या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ६.६-८.० किलोमीटरदरम्यान राहण्याची शक्यता आहे. १० रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
--------
चौकट
* मागील पाच दिवसातील दापोलीतील तापमान ः
तारीख* कमाल* किमान
३ जानेवारी* २९.८* १४.७
४ जानेवारी* ३१.६* १४.६
५ जानेवारी* ३१.९* १४.१
६ जानेवारी* ३०.८* ११.०
७ जानेवारी* ३१.०* ९.०
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.