मारुती मंदिर परिसरातील ''आयलंड'' बनले कपडे वाळविण्याचे साधन

मारुती मंदिर परिसरातील ''आयलंड'' बनले कपडे वाळविण्याचे साधन

Published on

-rat७p२.jpg-
२६O१६०९९
रत्नागिरी ः मारुती मंदिर परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी वाळत घातलेले कपडे.
----
‘आयलंड’ बनले कपडे वाळवण्याचे साधन
सौंदर्याला फेरीवाल्यांचे ग्रहण; नागरिकांमधून संताप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः रत्नागिरीच्या सौंदर्यपटलातील मुख्य केंद्र मानल्या जाणाऱ्या मारुती मंदिर येथील सुशोभीकरण सध्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले आहे. पालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या आयलंडवर परप्रांतीय फेरीवाले सर्रासपणे कपडे वाळत टाकत असल्याने शहराच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
काही महिन्यापूर्वी मारुती मंदिर परिसराचे रूप पालटण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. येथे सुंदर आयलंड, विद्युत रोषणाई आणि रेलिंग बसवून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले; मात्र, गेल्या काही दिवसांपासून या आयलंडच्या रेलिंगचा वापर परप्रांतीय फेरीवाले आपले कपडे वाळत घालण्यासाठी करत आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मंदिर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मुख्य सर्कललाच अशा प्रकारे अस्ताव्यस्त कपडे पसरलेले पाहून पर्यटकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. हे फेरीवाले कोणत्याही परवानगीशिवाय या जागेचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी करत आहेत. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com