कोकणविषयी सकारात्मक मुद्दे

कोकणविषयी सकारात्मक मुद्दे

Published on

-rat७p१३.jpg-
P२६O१६१३७
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचा दर्पण पुरस्कार दै. सकाळचे राजापूरचे प्रतिनिधी राजेंद्र बाईत यांना प्रदान करताना सुशील कुलकर्णी. डावीकडून माधव हिर्लेकर व डॉ. शरद प्रभुदेसाई.
-------
कोकणविषयी सकारात्मक मुद्दे समोर आणा
सुशील कुलकर्णी ः राजेंद्र बाईत यांना कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचा दर्पण पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : कोकणविषयी चांगल्या व सकारात्मक गोष्टी पत्रकार आणि मोबाईल वापरणाऱ्यांनी समाजमाध्यमांद्वारे प्रसारित कराव्यात. कारण, मुंबई-गोवा महामार्ग रखडला, खड्डे पडले अशा व्हिडिओमुळे कोकणाकडे पर्यटक पाठ फिरवतात, यातून आपण कोकणचे नुकसान करत आहोत. कोकणविषयी अनेक विषय समाजमाध्यमांतून येण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कोणते रस्ते सुरू आहेत, समस्या, पर्यावरण अशा अनेक गोष्टी प्रसारित करता येतील. याकडे साऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुशील कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघ आणि केजीएन फाउंडेशनतर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘सकाळ’चे राजापूरचे बातमीदार राजेंद्र बाईत यांना दर्पण पुरस्कार वितरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. बाळशास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कुलकर्णी म्हणाले, आजचे प्रचंड मोठे डिजिटल जग सर्वांसाठी खुले आहे. येथे विचार मांडता येतात. युट्यूबच नव्हे तर व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अशी अनेक समाजमाध्यमे तुम्हाला वापरता येतील. तरुण मुले समाजमाध्यमांचा वापर भरपूर करत आहेत. त्यामुळे चांगल्या, सकारात्मक गोष्टी पोहोचवण्यासाठी लोकांनी सक्रिय व्हावे. कोकणात आल्यावर थांबायचं कुठे, खायचं का, कुठून प्रवास केल्यावर अख्खे कोकण पाहू शकेन, कोणत्या घाटात काम सुरू आहे, व्यवसाय कोणते, रोजच्या येणाऱ्या माणसांना कोकणविषयी सकारात्मक माहिती देण्याची गरज आहे.
केजीएन व कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सुशील कुलकर्णी यांचा सन्मान केला. या प्रसंगी डॉ. शरद प्रभुदेसाई, चंद्रकांत हळबे, प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, ऋचा जोशी, सुयोगा जठार, दिलीप ढवळे, प्रमोद कोनकर, उमेश आंबर्डेकर, नीता कुवळेकर, शिल्पा पळसुलेदेसाई आदी उपस्थित होते. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com