संगमेश्वर-सेवाव्रती पाडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार जाहीर

संगमेश्वर-सेवाव्रती पाडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार जाहीर

Published on

-rat७p२२.jpg-
२६O१६१६९
मिताली जोशी
-rat७p२३.jpg-
P२६O१६१७०
विलास शेलार
-rat७p२४.jpg-
P२६O१६१७१
स्वप्नील परकाळे
-rat७p२५.jpg-
P२६O१६१७२
रसिका रेवाळे
-rat७p२६.jpg-
२६O१६१७३
राजेश नरवणकर
-rat७p२७.jpg-
२६O१६१७४
इम्तियाज सिद्दीकी
---------
सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार जाहीर
दापोलीत ११ जानेवारीला वितरण; सहाजण मानकरी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः सेवाव्रती शिंदे गुरूजींनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने गुरूजींच्या नावे सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून, ११ जानेवारीला दापोली येथील नवभारत छात्रालयात वितरण होणार आहे.
उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक (ग्रामीण) हा पुरस्कार कर्दे शाळेतील शिक्षक स्वप्नील परकाळे, आंबवली येथील शिक्षिका रसिका रेवाळे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (ग्रामीण) हा पुरस्कार एन. के. वराडकर हायस्कूलचे शिक्षक राजेश नरवणकर तर मिस्त्री हायस्कूलचे इम्तियाज सिद्दीकी यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (शहरी) पुरस्कार जाहीर झाला. उत्कृष्ट प्रगतिशील शेतकरी म्हणून दोन शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावचे विलास शेलार आणि आगवे (ता. लांजा) येथील महिला शेतकरी मिताली जोशी यांचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com