कशेडी घाटात कोल्ड्रिंक्स वाहणारा कंटेनर उलटला
- rat७p२९.jpg-
२६O१६२०१
खेड - कशेडी घाटातील चोळईनजीक अपघातग्रस्त झालेला शितपेयांची वाहतूक करणारा ट्रक.
-----
कशेडी घटात कंटेनर उलटला
वाहतूक ठप्प ; एक लेन बंद, क्रेनच्या साह्याने हटवण्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटपरिसरात बुधवारी सकाळी शितपेयांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने महामार्गावरील एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कंटेनर चालक राम आचल मिंद (रा. उत्तरप्रदेश) हा कंटेनरने लोटे येथून भिवंडी-वाडा दिशेने जात होते. कशेडी घाटातील पोलादपूरजवळील चोळई गावाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध उलटला. कंटेनरमधील शीतपेयांच्या बाटल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पाहावयास मिळत होते. कंटेनर आडवा झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी संपूर्ण लेन बंद पडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलिसांचाही ताफा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी खेड-पोलादपूर दिशेने जाणारी वाहतूक एका बाजूच्या लेनवर वळवून सुरळीत सुरू ठेवली. त्यामुळे महामार्गावर मोठा अडथळा निर्माण होण्यापासून बचाव झाला.
दरम्यान, महामार्गावर पडलेल्या शीतपेयांच्या बाटल्या बाजूला करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर रस्त्यापासून हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
----
वाहनचालकांचे हाल
कंटेनर उलटल्याने कशेडी घाट परिसरातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मात्र वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

