प्राध्यापक नियुक्तीसाठी अर्जाचे आवाहन
प्राध्यापक नियुक्तीसाठी अर्जाचे आवाहन
रत्नागिरी ः यूपीएससीमार्फत होणाऱ्या कम्बाईन डिफेन्स सर्विस एक्झामिनेशन २०२६ तयारीकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे तज्ज्ञ शिक्षकांची ३०० रुपये प्रती तासिकाप्रमाणे इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान या विषयांकरिता तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करणे आहे. संबंधित विषयाच्या इच्छुक प्राध्यापकांनी कागदपत्रासह ९ जानेवारीला सकाळी १०.३० वा. मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन ले. कर्नल विलास शंकर सोनावणे, (नि.) प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांनी केले आहे. इच्छुक उमेदवार हा संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित विषयात पदवीधर/पदव्युत्तर तज्ञ प्राध्यापक असावा तसेच उमेदवारास कमीत कमी दोन वर्षांचा स्पर्धा परीक्षेबाबत अध्यापनाचा अनुभव आवश्यक आहे.
सैन्यदलासाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण
रत्नागिरी ः भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक व युवतींसाठी १९ जानेवारी ते ३ एप्रिल या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आयोजित मुलाखतीस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे १३ जानेवारीला सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तथा प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑॅफ सैनिक वेलफेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील सीडीएस-६६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा.
माळवाशी येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
संगमेश्वर ः तालुक्यातील माळवाशी येथे १० जानेवारीपासून टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ओम साई सेवा मंडळ कडूवाडीने कै. सरपंच वैजयंती करंडे स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला २५ हजार ५५५ रु. व चषक, द्वितीय १५ हजार ५५५ रु. व चषक, तृतीय ५ हजार ५५५ रु. व चषक, चतुर्थ ३ हजार ३३३ रु. व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना चषक देण्यात येणार आहे. चार षट्कांचे हे सामने ओपन व पंचक्रोशीतील स्तरावर खेळवले जाणार आहेत. पांडुरंग करंडे व शिवराम कडू क्रीडानगरी माळवाशी-कडूवाडी येथे हे सामने १० ते १२ जानेवारीदरम्यान होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

