बांधकाम कामगारांसाठी योजनेचे २,८१५ लाभार्थी

बांधकाम कामगारांसाठी योजनेचे २,८१५ लाभार्थी

Published on

‘बांधकाम कामगार’ योजनेवर दलालांचा डोळा
जिल्ह्यात २ हजार ८१५ लाभार्थी ; ४ कोटी ७६ लाखांचे गृहोपयोगी संच वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ः महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ३२पेक्षा जास्त योजना राबवल्या जातात; परंतु काहीवेळा या योजनांच्या लाभासाठी बनावट नोंदणीचे प्रकार पुढे येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रशासनापुढे आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार कार्यालयाकडून २ हजार ८१५ कामगारांना ४ कोटी ७६ लाख ५४ हजार ६१७ रुपयांचे गृहोपयोगी संच वाटप करण्यात आले.
बांधकाम कामगारांना मंडळाकडून विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. या योजनांचा लाभ पात्र कामगारांना मिळावा यासाठी कामगारांची अधिकृत नोंदणी करावा लागते. जानेवारी २०२५ ते आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ७०१ कामगारांची नोंदणी झाली आहे. बांधकाम कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना, आरोग्यविषयक आणि आर्थिक योजना अशा सुमारे ३२ योजना राबवल्या जातात; मात्र यासाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कामगाराची अधिकृत नोंदणी करावी लागते; पण अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगार योजनेला अनधिकृत संस्था किंवा दलालांचा विळखा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामगारांची फसवणूकही होते. इतर ठिकाणी बनावट नोंदणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून अधिक सजगता बाळगली जात आहे.
-----
चौकट
जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार असे
तालुक्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार ः मंडणगड-१३१, दापोली-१७९०, खेड-४३८८, चिपळूण-२७४७, गुहागर-१५२५, संगमेश्वर-१९१९, रत्नागिरी-३८६७, लांजा-२५८०, राजापूर-२७५४ अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com