एलटीटी-करमळी रेल्वे १२ फेब्रुवारीपर्यंत धावणार
रेल्वेचे चित्र वापरा
‘एलटीटी-करमळी’१२ फेब्रुवारीपर्यंत धावणार
कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा ; अन्य गाड्यांवरील भार होणार कमी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक विशेष रेल्वेगाड्याही काही मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांवर गर्दीचा ताण असतो. यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वेगाडी १५ जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार होती; परंतु, ती १२ फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नाताळ आणि नववर्षानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमळीदरम्यान साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येत होती. १८ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत ही रेल्वेगाडी चालवण्याचे नियोजन होते; परंतु, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी या रेल्वेगाडीला १२ फेब्रुवारीपर्यंत चालवण्याचे नियोजन केले आहे. ही गाडी साप्ताहिक असून, एलटीटीवरून दर गुरूवारी रात्री १२.५० वा. सुटते. त्यानंतर मडगावला सकाळी ११.१५ वा. पोहोचते तर, तिचा परतीचा प्रवास करमाळी येथून दुपारी १.४० वा. सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी ती रात्री १२.१० वा. एलटीटीला पोहचते. ही रेल्वेगाडी मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोईस्कर आहे. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, करमाळी आणि मडगाव येथे थांबे आहेत तसेच या रेल्वेगाडीला प्रथम, द्वितीय, तृतीय वातानुकूलित डबा, पॅन्ट्री कार अशी डब्यांची संरचना आहे. ही रेल्वेगाडी उशिराने धावते. तसेच शौचालयात पाणी नसणे, अस्वच्छता रेल्वेगाडीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांद्वारे सातत्याने केल्या जातात.
-----
चौकट
करमाळी गाडीला ‘एलएचबी डबे’
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळी रेल्वेगाडीला २०२१ मध्ये लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) जोडण्यात आले आहेत. हे डबे आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले प्रवासी रेल्वेडबे आहेत. त्या डब्यांमध्ये अँटीक्लायबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्यसारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. जुन्या पद्धतीच्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत या डब्यांचा कार्यरत वेग अधिक आहे.
आयसीएफ डब्यांचा वेग १४० किमी प्रतितास आहे तर, एलएचबी डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास असून, हा वेग २०० किमी प्रतितासापर्यंत वाढवता येतो. भारतीय रेल्वेमार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

