माजगाव जपतोय ''धालोत्सवा''ची परंपरा

माजगाव जपतोय ''धालोत्सवा''ची परंपरा

Published on

swt86.jpg
16346
माजगावः म्हालटकरवाडा येथील धालोत्सव ''लग्न'' सोहळ्याने रंगतदार ठरला.

माजगाव जपतोय ‘धालोत्सवा’ची परंपरा
पारंपरिक सोहळा ः महिलांच्या लग्न सोहळ्याने उत्साहात सांगता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील धालोत्सवाची आज दुपारी उत्साहात सांगता झाली. लोककलांचा वारसा लाभलेल्या म्हालटकरवाडा येथील महिलांनी व पुरुषांनी आपली संस्कृतीची परंपरा आजही कायम टिकवून ठेवली आहे.
गेल्या सात रात्री सुरू असलेल्या धालोत्सवाची शेवटची रात्र वैशिष्ट्यपूर्ण ठरली. महिलांनी समोरासमोर फाटी धरल्यानंतर त्यामधील दोन स्त्रिया पतिपत्नी वेषभूषा करतात. वराची वाजतगाजत वरात वाड्यातून देवघराकडे लग्नासाठी येते व तुळशीकडे येऊन दानोशाला बसते, त्यावेळी ओव्या म्हटल्या जातात.
''रुखवात करतले गे सुंदरी, झेंडे बसले बरोबरी, असे झेंडे उतावळी, लाडू उचलले वरचेवरी'' असे म्हणत तिथून सर्व मंडळी मांडावर येतात. तिथे पतिपत्नी स्त्रियांचे लग्न लावले जाते. पतिपत्नी एकत्र येऊन दोन्ही फाटीत त्यांच्या समवेत लोकगीते म्हणतात. यावेळी ''शिवकळा'' असलेल्या देवीकडून सर्वांना तीर्थ घातले जाते. रात्री विविध कार्यक्रमानंतर त्यातील एक महिला पहाटे पिंगळी बनून इतर महिलांसमवेत वड्यातील प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे जमा करून ते मांडावर घेऊन येते.
सकाळी वाड्यातील पांगलेली सर्व मंडळी एकत्र येऊन कार्यक्रम सुरू करतात. त्यावेळी देवीच्या ओट्या भरणे, नवस बोलणे तसेच ज्या स्त्रीला मूल नाही, अशी स्त्री मांडावर शेणाच्या तुळशीत शिवकळाच्या मदतीने सोबत आणलेले हळद व दुधाचे मिश्रण ओतते, त्यावेळी ओव्या गातात. ''शेण कालवता शेण कालवता, शेणात पडले ''किडे'' गे ते, शेणात पडले ''किडे'' या पंक्ती गात तिला आधार देत देवी आशीर्वाद देतात. बाजूच्या घरी जाऊन पुनश्च साडी बदलून मांडावर आल्यानंतर तिच्या ओटीत नारळ घालतात. त्याचे खोबरे फक्त त्या पतिपत्नीनेच खायचे, अशी अट असते. सर्व देवी उपस्थितांना आशीर्वाद देतात. बाजूच्या घरी जाऊन पुनश्च साडी बदलून मांडावर आल्यानंतर तिच्या ओटीत नारळ घालतात. त्याचे खोबरे त्या पतिपत्नीच खायचे असते. या सर्व स्त्रियांच्या जागरणाची समाप्ती होऊन कार्यक्रम संपतो.
धालोत्सवासाठी ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, पंचक्रोशीतील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तुळशीतली पडली देवघरात आणून ठेवली जाते. पुढच्या वर्षापर्यंत तिला कोणी हात लावणार नसतो. पुन्हा नेहमीसारखा मांड शांत होतो आणि स्त्रियांना हुरहूर लावत सात दिवसांच्या गजबजलेल्या रात्रींची सांगता होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com