सिंधुदुर्गनगरीत रंगणार ॲथलेटिकचा थरार
सिंधुदुर्गनगरीत रंगणार ॲथलेटिकचा थरार
जिल्हा संघटनेचा पुढाकार; २० जानेवारीला विविध स्पर्धांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने यंदाची सब ज्युनिअर ॲथलेटिक स्पर्धा २० जानेवारीला सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे आयोजित केली आहे. सर्वांनी सकाळी ८ वाजता मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटना सचिव कल्पना तेंडुलकर यांनी केले आहे.
यासाठी ८ वर्षांखालील मुलगे व मुलींची ९ फेब्रुवारी २०१८ ते ८ फेब्रुवारी २०२० जन्मतारीख आवश्यक आहे. दहा वर्षांखालील मुलगे व मुली ९ फेब्रुवारी २०१६ ते ८ फेब्रुवारी २०१८, बारा वर्षांखालील मुलगे व मुली यांच्यासाठी ९ फेब्रुवारी २०१४ ते ९ फेब्रुवारी २०१६, १४ वर्षांखालील मुलगे व मुली यांच्यासाठी ९ फेब्रुवारी २०१२ ते ८ फेब्रुवारी २०१४ जन्मतारीख आवश्यक आहे. जन्म प्रमाणपत्राची मूळ प्रत आवश्यक असून त्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धा वयोगटाप्रमाणे पुढीलप्रमाणे - ८ वर्षांखालील मुलगे आणि मुली-५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे. स्टँडिंग ब्रॉड जंप. १० वर्षांखालील मुलगे व मुली-५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, गोळा फेक, १ कि.ग्रॅ. स्टँडिंग थ्रो. १२ वर्षांखालील मुलगे आणी मुली-६० मीटर धावणे, ३०० मीटर धावणे (मास स्टार्ट), लांब उडी (५ मीटर रन वे), गोळा फेक १ कि.ग्रॅ. (स्टँडिंग थ्रो), ४×१०० मीटर रिले. १४ वर्षांखालील मुलगे व मुली-८० मीटर धावणे, ३०० मीटर धावणे (मास स्टार्ट), लांब उडी (५ मीटर रनवे), गोळा फेक (२ किलो), (स्टँडिंग थ्रो), ४×१०० मीटर रिले.
राज्य स्पर्धा कोपरगाव अहिल्यानगर येथे ७ व ८ फेब्रुवारीला होतील. जिल्ह्यात प्रथम ३ क्रमांक जे येतील, त्यांना राज्य स्पर्धेत सहभागी होता येईल. राज्य स्पर्धेसाठी प्रवास, निवास, भोजन व्यवस्था स्पर्धकांना स्वतः करावी लागेल. जिल्हा स्पर्धेत कोणत्याही तीन इव्हेंट्समध्ये व राज्य स्पर्धेत कोणत्याही २ इव्हेंट्समध्ये सहभागी होता येईल.
खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता सचिव कल्पना तेंडुलकर, बाळकृष्ण कदम येथे संपर्क करावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रणजितसिंग राणे, अजय शिंदे, रामदास देशमुख यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

