-रिंगणेत रंगणार ग्रामीण साहित्य संमेलन
रिंगणेत दोन दिवस ग्रामीण साहित्य संमेलनाचा जागर
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजन ; विदूर महाजन यांची मुलाखतीसह सतारवादन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ८ ः राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन रिंगणे या गावी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे भूषवणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक विदुर महाजन यांचे सतारवादन हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे.
नागरिक संघ गेली १० वर्षे लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलने घेत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून उदयोन्मुख आणि नवीन लेखक, कवी व कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ऐतिहासिक व सौंदर्यपूर्ण पर्यटनस्थळे प्रकाशात आणणे, त्या निमित्ताने त्या परिसराच्या विकासाला चालना देणे हा संघाचा उद्देश आहे.
या संमेलनाबाबत राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड म्हणाले, या संमेलनाअंतर्गत ३० जानेवारीला सकाळी ८ ते १० रांगोळी प्रदर्शन, १० ते १२ पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. सायंकाळी नदीजल पूजन त्यानंतर रात्री ८ वा. चौथरा हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारीला संमेलनाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी ८ वा. ग्रंथदिंडी काढण्यात येईल. त्यानंतर दहा वा. संमेलनाचे उद्घाटन होईल. दुपारी दोन ते तीन या वेळेत मुलांच्या एकांकिका स्पर्धा होणार असून, तीन ते चार या वेळेत मुलांचे कथाकथन व भाषणे होतील. सायंकाळी चार ते पाच या वेळेत मराठी भाषा आणि तिचा इतिहास या विषयावर प्रख्यात वक्ते कुलकर्णी यांचे व्याख्यान आणि परिसंवाद होणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत परिसंवाद-कोकण संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये डॉ. निधी पटवर्धन, डॉ. पार्थ काळे, ऋषिकांत राऊत, रामदास खरे हे सहभागी होणार आहेत. सहा ते सात या वेळेत सचिन करडे यांचा शिवचरित्र कार्यक्रम होईल. ७.३९ ते रात्री ८.३० या वेळेत स्थानिक कवी संमेलन होणार असून, त्यानंतर निमंत्रितांचे काव्य संमेलन होणार आहे. १० ते ११.३० या वेळेत प्रख्यात सतारवादक विदुर महाजन यांचे सतारवादन आणि दिनेश मोरे त्यांची मुलाखत घेणार आहेत. पत्रकार परिषदेला संघाचे अमर खामकर, काशिनाथ चव्हाण, संजय अहिरे, गणपत शिर्के, स्नेहल आयरे, बाळकृष्ण चव्हाण, विजय आयरे, विजय हटकर आदी उपस्थित होते.
---------
चौकट
व्यंगचित्रकार प्रभाकर वाईकरांची मुलाखत
१ फेब्रुवारीला मुलांच्या एकांकिका, फॅशन शो असे कार्यक्रम होतील तसेच पुरस्कार वितरण सोहळा होईल. यामध्ये ९० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईकर यांची मुलाखत, कोकण भूषण पुरस्कार वितरण सोहळा, जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा, रांगोळी, पाककला स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि इतर पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच नववधू सन्मान सोहळा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

