रत्नागिरीत संस्कृत कार्यशाळा
-rat८p६.jpg-
२६O१६३३९
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे. डावीकडून डॉ. दिनकर मराठे, शिरीष भेडसगावकर, डॉ. कल्पना आठल्ये व स्मिता सरदेसाई.
----
संस्कृतचा प्रचार-प्रसार ही काळाची गरज
शिक्षणाधिकारी मेंगाणे ः सरलमानक संस्कृतम कार्यशाळेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : संस्कृत ही भारताने अभिमान बाळगावा, अशी भाषा आहे. एखादी भाषा मरत असते तेव्हा संस्कृती मरत असते. त्यामुळे संस्कृत भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी व येणाऱ्या पिढीपर्यंत संस्कृतचा प्रचार, प्रसार केला पाहिजे. याकरिता रत्नागिरीचा शिक्षण विभाग मदत करेल. सध्या अनेकजण टेक्स्ट मेसेज केल्याप्रमाणे बोलू लागले आहेत. कोणत्याही भाषेकरिता हे घातक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेला महत्व दिले असून, त्याकरिता संस्कृत अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात आयोजित सरलमानक संस्कृतम या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संस्कृत उपकेंद्र भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोगटे महाविद्यालयाचा संस्कृत विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत शिक्षक मंडळाच्या सहयोगाने कार्यशाळा सुरू झाली. या वेळी प्रमुख पाहुणे संस्कृत भारतीच्या अखिल भारतीय गीता शिक्षणकेंद्राचे प्रमुख शिरीष भेडसगावकर, अध्यक्षस्थानी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि उपस्थित होते.
डॉ. मराठे म्हणाले, सरलमानक संस्कृतम आणि संस्कृत विषय संस्कृतमधून शिकवण्यावर तीन दिवस कार्यशाळा आयोजित केली आहे. यातून संस्कृतचा प्रचार मोठ्या प्रमाणावर होईल. डॉ. आठल्ये यांनी संस्कृतमधून बोलणे, शिकवणे यासाठी ही कार्यशाळा आहे. संस्कृत शिक्षक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे संस्कृत प्रमाण कळण्यासाठी ही कार्यशाळा खूप उपयुक्त ठरणार आहे, असे सांगितले.
--
कोट
संस्कृत शिक्षकांनी व संस्कृतप्रेमींनी संघटितपणे संस्कृतचा प्रचार, प्रसार केला पाहिजे. संस्कृत ही फक्त पूजापाठाची भाषा, कठीण भाषा असल्याचे काही भ्रम आहेत. शास्त्रीय पद्धतीने भाषा पाहिली तर संस्कृत सोपी आहे. प्रथम ऐका मग बोला, शिका व व्याकरण शिका या क्रमाने आपण सहज शिकू शकतो. शिक्षकांनी आवर्जून तसे शिकवावे.
- शिरीष भेडसगावकर, संस्कृत भारती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

