सिंधुदुर्गातील पर्यावरणाचा आधार हरवला
सिंधुदुर्गातील पर्यावरणाचा आधार हरवला
माधव गाडगीळ यांना आदरांजली; जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींची भावना
लीड
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः सावंतवाडी तालुक्यातील पर्यावरण प्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. पश्चिम घाटातील निसर्ग आणि वन्यजीव वाचवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा कायम लक्षात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
- रुपेश हिराप
------------
swt88.jpg
16363
ॲड .नकुल पार्सेकर
कोट
डॉ. माधवराव गाडगीळांच्या निधनाने पर्यावरणाचे रक्षक अनंतात विलीन झाले आहेत. ऑक्टोबर २०१० मधील त्यांच्या कोकण दौऱ्यातील ते तीन दिवस माझ्यासाठी ‘मंतरलेले’ होते. कळणे मायनिंगमुळे झालेली निसर्गाची हानी पाहून ते ज्या संवेदनशीलतेने हळहळले, ते आजही माझ्या स्मरणात आहे. सावंतवाडीच्या संस्थानकालीन नळयोजनेवर येणाऱ्या संकटाबाबत मी दिलेल्या निवेदनाची एका फोनवर दखल घेऊन, त्यांनी तो विषय आपल्या अहवालात अधोरेखित केला. एवढा मोठा जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ एका सामान्य कार्यकर्त्याच्या पत्राला इतकं महत्त्व देतो, हे त्यांच्या मोठेपणाचे दर्शन होते.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यावेळी सह्याद्रीच्या रक्षणासाठी त्यांना साद घातली होती. त्यांनी दिलेला ''गाडगीळ अहवाल'' हा भूमाफिया आणि दलालांसाठी अडचणीचा ठरला; पण केरळचा पूर आणि माळीण दुर्घटनेने त्यांचे शब्द किती सत्य होते हे जगाला दाखवून दिले. आज देश एका महान अभ्यासकाला मुकला आहे. त्यांनी सुरू केलेली ही चळवळ पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. - - ॲड .नकुल पार्सेकर, सावंतवाडी
-------------
swt89.jpg
16364
डॉ. जयेंद्र परुळेकर
कोट
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांचे निधन हे निसर्ग संवर्धन चळवळीचे मोठे नुकसान आहे. सहा राज्यांतून जाणाऱ्या पश्चिम घाटाचे, म्हणजेच आपल्या सह्याद्री पर्वत रांगांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर सातत्याने पाठपुरावा केला.
कोकणासह संपूर्ण पश्चिम घाटात वृक्षतोड होऊ नये, मायनिंग आणि तत्सम प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नयेत, तसेच हरित प्रकल्प जास्तीत जास्त प्रमाणात यावेत यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. पश्चिम घाटातील जैवविविधता आणि विपुल वनसंपदेचे ते खऱ्या अर्थाने रक्षणकर्ते होते. त्यांचे मार्गदर्शन हे पश्चिम घाटातील निसर्ग आणि वन्यजीव वाचविण्यासाठी येणाऱ्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ते मांगेली हा दोन तालुक्यातील सह्याद्रीपट्टा आगामी काळात ''इको सेन्सिटिव्ह'' जाहीर होणे, हीच त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
- डॉ. जयेंद्र परुळेकर, पर्यावरण प्रेमी
-------------
swt810.jpg
16362
स्टॅलिन दयानंद
कोट
डॉ. माधव गाडगीळ यांना दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटण्याचे परमभाग्य लाभले. त्यांचे अफाट ज्ञान, ऋषींसारखा साधेपणा आणि कामाप्रती असलेला कमालीचा प्रामाणिकपणा पाहून मी नि:शब्द झालो होतो. ते केवळ एक जागतिक दर्जाचे पर्यावरणशास्त्रज्ञ नव्हते, तर आपल्या तत्त्वांसाठी शेवटपर्यंत झुंज देणारे एक खऱ्या अर्थाने ‘लढवय्ये महापुरुष’ होते. खाणकाम आणि लाकूडतोड लॉबीच्या हितासाठी सरकारने पश्चिम घाटाच्या संरक्षणाचा त्यांचा ऐतिहासिक अहवाल बासनात गुंडाळून ठेवला; पण ते आपल्या भूमिकेपासून तसूभरही डगमगले नाहीत. आजच्या काळात, जिथे सरकारी मर्जी राखण्यासाठी बौद्धिक लाचारी स्वीकारली जाते, तिथे त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि इमानाचा कधीही सौदा केला नाही. वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून, घनदाट जंगलांचा दौरा केला आणि भविष्याचा वेध घेणारा अहवाल सादर केला. मात्र, सरकारने त्यांच्या या कष्टाची साधी दखलही घेऊ नये, हे आपल्या व्यवस्थेचे मोठे दुर्दैव आहे. पण, त्यांनी दिलेली प्रेरणा आम्हाला सतत बळ देत राहील.
- स्टॅलिन दयानंद, वनशक्ती संस्था
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

