लोकसेवा पूर्व परीक्षेस ८१० उमेदवार

लोकसेवा पूर्व परीक्षेस ८१० उमेदवार

Published on

लोकसेवा आयोग पूर्व
परीक्षेस ८१० उमेदवार
रत्नागिरी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ११ जानेवारीला रत्नागिरी तालुक्यातील दोन उपकेंद्रांवर एक सत्रामध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ८१० उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील उपकेंद्रांवर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळवले आहे. यामध्ये पटवर्धन हायस्कूल उपकेंद्रावर RT००१००१ ते RT००१३६०, फाटक हायस्कूल उपकेंद्रावर RT००२००१ ते RT००२४५० बैठक व्यवस्था आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

संदीप फेपडे यांना
राज्यस्तरीय पुरस्कार
खेड ः खेड तालुक्यातील घरडा फाउंडेशन संचालित घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी व संगमेश्वर तालुक्यातील कोसुंबचे सुपुत्र संदीप फेपडे यांना पुणे येथील शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे सामाजिक व शैक्षणिक योगदानाकरिता समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तालुक्यातील घरडा फाउंडेशन संस्थेमार्फत व घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असणारे फेपडे गेली ३० वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये शेतीविकास, सामाजिक विकासात्मक कार्य, आरोग्य जाणीवजागृती, शैक्षणिक उपक्रम यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.

विद्यार्थी, शिक्षकांसह
पालकांसाठी स्पर्धा
रत्नागिरी ः विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी https://innovateindia१.mygov.in@from वर ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रकल्प संचालक सागर पाटील यांनी केले आहे. स्पर्धेतील सहभागांना उच्चशिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालयाच्यामार्फत या कार्यक्रम एनसीईआरटीद्वारे संक्षिप्त केलेले निवडक प्रश्न समाविष्ट केले जाऊ शकतात.


‘कामगार कल्याण’तर्फे
कार्ड वाटप
खेड ः शहरातील प्रभाग क्र. ६ मधील १२ महिलांना नगरसेवक सतीश चिकणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे कार्डचे वाटप करण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी शिवसेना नगरसेवक चिकणे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. यासाठी गृहराज्यमंत्री कदम यांचे शासकीय स्वीय सहाय्यक दरेकर यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी गटनेते निकेतन पाटणे, नगरसेविका वैभवी खेडेकर, वर्षा सापटे, तुषार सापटे, मंडळाचे अध्यक्ष श्रीधर शिंदे, उपाध्यक्ष सचिन सकपाळ, मंगेश केसरकर, अशोक जाधव, दिलीप जड्याळ, एकविरा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव
समितीची १४ ला सभा
खेड ः शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर १४ जानेवारी रोजी सायं. ६ वा. मराठा भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा भवन येथे झालेल्या सहविचार सभेत शिवजयंती निमित्ताने मिरवणूक प्रतिवर्षाप्रमाणेच सकाळी काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मिरवणुकीचा मार्ग भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मराठा भवनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बाईक रॅली काढण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठ प्रतिवर्षाप्रमाणे ठरलेल्या मार्गाप्रमाणेच पालखीसह पायी मिरवणूक काढण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com